Dhule Shivsena Protest | देवाधर्माच्या आडून होणाऱ्या बेकायदेशीर कामांना ठाम विरोध; ठाकरे गटाचा इशारा

Dhule Shivsena Protest | देवाधर्म, राष्ट्रपुरुषांच्या नावाचा आडोसा घेऊन बेकायदेशीर कामे केली जात असतील, तर त्याला ठाम विरोध करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दिला आहे.
Shivsena UBT
Shivsena UBTPudhari
Published on
Updated on
Summary
  1. देवाधर्माच्या नावाखाली बेकायदेशीर कामांना विरोध करण्याचा इशारा

  2. पांझरा नदीतील शक्तीपीठ प्रकल्पाला न्यायालयाची स्थगिती

  3. भाजपवर जागा हडपण्याचा आणि निधी गैरवापराचा आरोप

  4. नगरसेवकांच्या ठरावांमधून मोठा घोटाळा होण्याची शक्यता

  5. अतिक्रमण कारवाईवरून सरकारवर दुजाभावाचा आरोप

धुळे : देवाधर्म, राष्ट्रपुरुषांच्या नावाचा आडोसा घेऊन बेकायदेशीर कामे केली जात असतील, तर त्याला ठाम विरोध करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दिला आहे. यासाठी प्राण गेले तरी मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. धुळे शहरातील पांझरा नदी पात्रात उभारण्यात येणाऱ्या शक्तीपीठ प्रकल्पाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे.

Shivsena UBT
Selu PWD Protest | सेलू-परभणी रोडवर जीवघेणा प्रवास; संतप्त नागरिकांचा प्रशासनाला इशारा

या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, देवाधर्माच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली सुमारे ३५०० चौरस फुट जागा बळकावण्याचा प्रकार उघड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच शक्तीपीठ प्रकल्पासाठी सुमारे साडे चौदा कोटी रुपयांचा घाट आणि पुलाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला, मात्र प्रत्यक्षात वेगळ्याच प्रकारचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नदीपात्रात सांडपाणी आणि गटार वाहत असताना त्या ठिकाणी मंदिर उभारणे म्हणजे देवाधर्माची विटंबना असल्याची टीका शिवसेनेने केली.

शिवसेनेने पुढे आरोप केला की, मंदिर बांधकामासाठी शासन निधी मिळत नसताना घाट बांधण्याच्या नावाखाली निधी वळवला जात आहे. हा प्रकार म्हणजे शासनाची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Shivsena UBT
Water Crisis | कासारी खोऱ्यात पाणी टंचाईचे सावट! कासारी धरणात केवळ 0.80 टीएमसी साठा शिल्लक

अतिक्रमण कारवाईवरही टीका

अतिक्रमण हटवताना एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला. २०११ पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायदेशीर संरक्षण असताना देखील कारवाई केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोठ्या घोटाळ्याची शक्यता?

नगरसेवकांच्या ठरावातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत, जळगाव घरकुल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा धुळ्यात होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला. कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्याचा आरोप करत, भविष्यात याचे परिणाम नगरसेवकांनाच भोगावे लागतील, असेही पत्रकात म्हटले आहे.

एकूणच, धुळे शहरातील विकासकामे, धार्मिक प्रकल्प आणि अतिक्रमण कारवाई या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र होत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news