

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील मोहगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने लोकनियुक्त सरपंच यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे.
आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष्मण महाले हे सन 2022 मध्ये थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. निवडणूक लढवतांना निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सत्य माहिती द्यावी लागते. मात्र सरपंच लक्ष्मण हौशा महाले यांनी गावठाण जागा नमुना नंबर 8 अ.नं.8 चे क्षेत्र 22:15-330 चौ.फुट.सादर केली. मात्र मोहगाव ग्रामपंचायतीत वडपाडा गावाचाही समावेश आहे. येथील मीना उत्तम देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. सरपंच लक्ष्मण महाले यांनी जास्तीचे अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तसेच स्थानिक ग्रामसेवकाविरुद्ध ही तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी होवुन विस्तार अधिकाऱ्यांच्या अहवालात 48 चौ.फुट अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. तसेच सरपंच लक्ष्मण महाले व त्यांचा भाऊ पोपट हौशा महाले व वडील हौशा कोळशा महाले यांचे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेत अं.न.8 ही मालमत्ता असून नमुना नंबर नुसार 23÷20460 चौ.फु.न.नं.8 वर असताना 63÷49-3078 चौ.फु.जास्तीचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.
यासंदर्भात 27 जानेवारी 2023 रोजी सरपंचांविरोधात ग्रामस्थांनी अर्ज दिला होता. याबाबत उच्चस्तरीय चौकशी दि.4 मे 2023 मध्ये पूर्वीच्या घराच्या नोंदीत व प्रत्यक्ष घराचे मापात तफावत आढळली. यात 827 चौ.फुट.इतके सरकारी मिळकतीवर अतिक्रमण करून बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाले. सरपंच लक्ष्मण हौशा महाले यांचे कुटुंबाचे नावे असलेल्या ग्रामपंचायत मालमत्ता क्र.7,8 व 9 यांच्या नमुना नंबर 8 च्या क्षेत्रापेक्षा जास्तीचे बांधकाम करून अतिक्रमण केले असल्याचे ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून सिद्ध झाले. त्यामुळे सरपंच लक्ष्मण महाले यांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अपात्र घोषीत केले आहे. तक्रारदार मीना देशमुख यांच्यातर्फे ऍड.परवेज एन तांबोळी व ऍड.अन्सारी यांनी काम पाहिले.
हेही वाचा –