Malegaon Municipal |मालेगाव मनपा आयुक्तपदाचा कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे

Malegaon Municipal Commissioner Charge Dhule Collector - मालेगावच्या कन्या भाग्यश्री विसपुते यांच्यावर जबाबदारी
 भाग्यश्री विसपुते
भाग्यश्री विसपुते Pudhari photo
Published on: 
Updated on: 

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील मनपा आयुक्तपद रिक्त झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने आदेश जारी केला आहे.

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, भाग्यश्री विसपुते या मालेगावच्या कन्या असून, त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. त्यामुळे शहराच्या प्रशासकीय कारभाराची धुरा मालेगावशी नाळ जुळलेल्या महिला अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.

 भाग्यश्री विसपुते
Malegaon Municipal Corporation | मालेगाव मनपा महासभेत आयुक्तांच्या नामकरणाचा पेच टळला; गोंधळाच्या शक्यतेमुळे सभा तहकूब

पूर्णवेळ नियुक्तीची प्रतीक्षा

आयुक्त जाधव ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली. या घडामोडींनंतर आयुक्तपद रिक्त आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असला, तरी मनपाला पूर्णवेळ आयएएस अधिकारी मिळावा, अशी मागणी होत आहे

 भाग्यश्री विसपुते
Dengue Outbreak | सिन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक तीव्र; एका महिन्यात 11 नवीन रुग्णांची नोंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.