Devlali Railway Station | फूटओव्हर ब्रिज, फलाटातून रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

Devlali Railway Station | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात ९२ पैकी ९० विकासकामांना मंजुरी
Devlali Railway Station
Devlali Railway Station
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कुंभक्षेत्रासाठी एकूण २२ विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी २० कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामांमध्ये स्थानकांचा पुनर्विकास, यार्डचे आधुनिकीकरण, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, नवीन फूटओव्हर ब्रिज, उंच फलाट, कव्हर शेड, पाणीपुरवठा व्यवस्था, होल्डिंग एरिया आणि विविध नागरी, विद्युत व सिझलिंग कामांचा समावेश आहे.

Devlali Railway Station
Ratnagiri News : कोरे मार्गावर नदीभागात फ्लड वॉर्निंग सिस्‍टीम

कुंभ क्षेत्रातील नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे वा पाच प्रमुख स्थानकांवर सर्वाधिक विकासकामे सुरू आहेत. याठिकाणी नऊ नवीन फूटओव्हर ब्रिज उभारले जात आहेत. त्यापैकी नाशिकरोड येथे १२ मीटर रुंदीचा, तर उर्वरित स्थानकांवर ६ मीटर रुंदीचे आठ फुटओव्हर ब्रिज बांधले जात आहेत.

याशिवाय विद्यमान फलाटांचे रुंदीकरण, नवीन उच्चस्तरीय फलाटांची उभारणी आणि ५१ हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रावर कव्हर शेड उभारण्यात येत आहेत. पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी नवीन जलसाठा टाक्या, अतिरिक्त स्वच्छतागृहे आणि फिरण्यासाठी प्रशस्त एरियाही विकसित केले जात आहेत.

स्थानकांच्या विकासासोबतच मनमाड-इगतपुरी रेल्वेमार्गावर ऑटोमेंटिक ब्लॉक सिग्नलिंग, १२ स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ट्रॅक, विद्युत, सिमल व्यवस्थेचे आधुनिकीकरणही वेगाने सुरू आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून ही कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत.

खेरवाडीत उच्चस्तरीय फलाट खेरवाडी स्थानकावर तीन अतिरिक्त स्टेबलिंग लाइन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, दोन नवीन उच्चस्तरीय फलाट, दोन फूटओव्हर ब्रिज, कव्हर शेड, २.५ लाख लिटर क्षमतेची पाणी साठवण व्यवस्था आणि १२ स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. कसबे सुकेणे स्थानकावर अतिरिक्त लूप लाइन, तीन स्टेबालिग लाइन्स, फलाटाचे रुंदीकरण, दोन फूटओव्हर ब्रिज, कव्हर शेड, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि दोन होल्डिंग एरिवा विकसित केले जात आहेत. या सर्व विकासकामांमुळे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नाशिकरोडला सर्वाधिक कामे

नाशिकरोड स्थानकावर सर्वाधिक प्रमाणात कामे सुरू आहेत. यार्डचे आधुनिकीकरण, आपत्कालीन क्रॉसओव्हर, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, १२ मीटर रुंदीचा नवीन फूटओव्हर ब्रिज, विद्यमान पुलाच्या जागी नवीन पूल, सहा एस्केलेटर, फलाटांचे रुंदीकरण, अतिरिक्त शेड, १६ नवीन स्वच्छतागृहे आणि शाहीस्नानाच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारले जात आहेत.

ओढा स्टेबलिंग केंद्र

ओद्य स्थानकाचे मोठ्या स्टेबलिंग केंद्रात रूपांतर करण्यात येत असून, तीन अतिरिक्त लूप लाइन्स, सहा स्टेबलिंग लाइन्स, दोन फूटओव्हर ब्रिज, नवीन फलाट, कव्हर शेड, २.५ लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा व्यवस्था, १२ स्वच्छतागृहे आणि दोन होल्डिंग एरिया उभारले जात आहेत. या कामांसाठी आवश्यक भूसंपादनही पूर्ण झाले आहे.

Devlali Railway Station
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

देवळाली प्रमुख रेल्वे संचालन केंद्र

देवळाली स्थानकाचा सिंहस्थासाठी प्रमुख रेल्वे संचालन आणि प्रवासी व्यवस्थापन केंद्र म्हणून विकास केला जात आहे. सध्या नवीन टर्मिनल प्लॅटफॉर्म, तीन अतिरिक्त लूप लाइन्स, स्टेबलिंग लाइन, दोन पिट लाइन्स, सिक लाइन, शंटिंग नेक आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे सुरू आहेत.

दोन नवीन २४ डब्यांच्या क्षमतेचे उंच फलाट, दोन फूटओव्हर ब्रिज, अतिरिक्त शेड, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारले जात आहेत. याशिवाय कोच तपासणी केंद्र, कर्मचारी सुविधा, संपर्क रस्ते आणि जलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news