CM Devendra Fadnavis | नाशिक पोलिसांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

CM Devendra Fadnavis | नाशिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करताना पीडित महिलांना धीर दिल्यामुळे त्या तक्रारींसाठी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
CM  Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अशोक खरात याचे संपूर्ण प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून, खरातने त्याच्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचे समोर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात स्पष्ट केले. नाशिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करताना पीडित महिलांना धीर दिल्यामुळे त्या तक्रारींसाठी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

CM  Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ashok Kharat Case | चिंचोक्यांना पॉलिश करून बनवली 'दैवी रत्ने'! भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधींच्या फसवणुकीचा असा झाला पर्दाफाश

विशेष म्हणजे या प्रकरणात अजून काही महिला समोर येणार असल्याचे सूतोवाचदेखील मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक पोलिसांनी अत्यंत तत्परतेने खरातचा ट्रॅक तयार करून ही कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात महिलांचे शोषण झालेले असल्यामुळे त्यांची मोठी फसवणूक झालेली होती.

पण, या संबंधित महिला समोर यायला तयार नव्हत्या. या महिलांना नाशिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने धीर देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. आता काही महिलांनी खरातविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

CM  Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Keri Sattari Goa | जैवविविधतेने नटलेला केरी गाव

उर्वरित अजून काही महिला या प्रकरणात तक्रारी करतील, असेही ते म्हणाले. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी धडाडीने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून कारवाईची तयारी सुरू होती. एका गुन्ह्याचा आधार घेऊन खरातच्या अटकेच्या आधीच लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. खरातची चौकशी सुरू असल्याने मंगळवारी (दि. २४) पुन्हा मी सखोल निवेदन करणार आहे..

हा राजकारणाचा प्रश्न नाही. तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असून, आपल्या सगळ्यांना तो जपावा लागणार आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणे, वेगळ्या शक्ती असल्याचे भासवून महिलांचे ब्रेन वॉशिंग करणे असे प्रकार या प्रकरणात घडलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक माहिती सभागृहाला दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news