Ashok Kharat Case | चिंचोक्यांना पॉलिश करून बनवली 'दैवी रत्ने'! भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधींच्या फसवणुकीचा असा झाला पर्दाफाश

अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यांचे उदाहरण नसून, समाजातील अंधश्रद्धा, भीती आणि भावनिक दुर्बलतेचा गैरफायदा कसा घेतला जाती याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : निखिल रोकडे

अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यांचे उदाहरण नसून, समाजातील अंधश्रद्धा, भीती आणि भावनिक दुर्बलतेचा गैरफायदा कसा घेतला जाती याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे, अध्यात्माच्या आड लपवलेले शोषण, आर्थिक फसवणूक, तांत्रिक ब्लॅकमेलिंग आणि वन्यजीव कायद्याचे उल्लंघन अशा अनेक स्तरांवर हे प्रकरण विस्तारले आहे.

Ashok Kharat Case
Parenting Tips for Teenagers | प्रेम की केवळ आकर्षण? मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी उलगडले अल्पवयीन मुलींच्या फसवणुकीचे 'दुष्टचक्र'

तपास पुढे जात असताना अजूनही अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पीडितांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारांना आळा चसावा यासाठी कठोर कारवाईची मागणी समाजातून होत आहे महिला लैंगिक शोषण प्रकरणात सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला भोंद अशोक खरात वाच्या फसवणुकीच्या कारवायांचे नवनवे धक्कादायक पैलू उघड होत आहेत.

आध्यात्मिक शक्ती आणि देवी लोकांना आसीवादाच्या नावाखाली ला कार्यक फसवणुकीसाठीही अत्यंत कपटी आणि योजनाबद्ध मार्ग अवलंबल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, साध्या चिंचोक्यांना विशेष रासायनिक पॉलिश करून त्यांना आकर्षक आणि चमकदार रूप दिले जात असे त्यानंतर या चिंचोक्यांना दैवीशक्ती प्राप्त अनमोल रत्ने असल्याचे भासवून मोठ्या किमतीत विक्री केली जात होती.

ग्रहदोष दूर होणे, नशीव उजळणे, व्यवसायात यश मिळणे, कौटुंबिक कलह संपणे अशा विविध आमिषांद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जात असे. या बनावट रत्नांच्या विक्रीतून खरातने लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला असून, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि किती जणांना याचा फटका बसला आहे, याचा शोध घेतला जात आहे. या माध्यमातून उभारलेले त्याचे आर्थिक साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

Ashok Kharat Case
Ashok Kharat Case | पीडितांची ओळख राहणार गुप्त! खरात प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सुरक्षित गढीत

चिंचोक्यांना रत्न बनवून कोट्यवधींचा गोरखधंदा !

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक बाबी सातत्याने समोर येत असून, महिलांच्या लैंगिक व मानसिक शोषणाचा हा प्रकार केवळ अलीकडचा नसून तब्बल १५ ते २० वर्षांपासून सुरू असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. मरगुती अडचणी, वैवाहिक तणाव आणि आरोग्य समस्यांवर उपाय देण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत हा प्रकार दीर्घकाळ चालू ठेवण्यात आला असल्याचे स्पष्ट होत आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या काळात शेकडो महिलांची फसवणूक व शोषण झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक महिला भीती, सामाजिक दबाव आणि बदनामीच्या धास्तीमुळे पुढे येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष तक्रारींचा आकडा कमी असला तरी, पीडितांचा वास्तविक आकडा मोठा असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिलांची संख्या ५००च्या पुढे गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आता अधिकाधिक महिलांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत असून, या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि भीतीचा कसा गैरफायदा घेतला जातो, याचेही भीषण चित्र समोर येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news