Keri Sattari Goa | जैवविविधतेने नटलेला केरी गाव

Keri Sattari Goa | केरी हे सत्तरी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव असून ते सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि वाळवंटी नदीकाठी वसलेले आहे. या गावाला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. पश्चिम घाटाचा भाग असल्याने हे गाव जैवविविधतेने नटलेला आहे.
Keri Sattari Goa
Keri Sattari Goa
Published on
Updated on

केरीच्या इतिहासात २६ जानेवारीचे विशेष महत्व असल्याने प्रा. राजेंद्र केरकर यांनी परिक्रमेसाठी फेरी हा गाय निवडला. विवेकानंद ज्ञान मंदिर स्कूलच्या संकुलात परिक्रमेला सुरुवात झाली. मागे सुंदर असा वाघेरीचा डोंगर आणि सह्याद्रीच्या रांगा जवळच असलेले निलगिरीचे झाड आणि उसाचा मळा सर्वच मनमोहक करून टाकणारे होते.

Keri Sattari Goa
Porvorim Fake Currency Case | पर्वरीतील एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा करणारा जेरबंद

घनदाट जंगल, नारळ पोफळीच्या बागायती, उपवने (देवराई) यांनी हा परिसर नटलेला आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गोवा-बेळगाव महामार्गावर हा गाव असल्याने गावाचा विकासही होत आहे. हा गाव १२४१.८५ हेक्टर क्षेत्रपाळात विखुरला आहे. घोटेली, शिरोली, हणजुणे, गुळ्ळे, झमें, साचलेली आणि मोर्ले या गावांनी वेढलेल्या फेरी गावापासून महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा काडीच अंतरावर आहे.

चोर्लाघाट मार्गाच्या पायथ्याशी हा गाव बसलेला असल्याने पूर्वीच्या काळी या गावाला व्यापार उद्योगाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. शेकडो वर्षापूर्वी हेवर व मेशे लोकांचे वास्तव येथील गायांमध्ये असावे असे लोककथातून दिसून येते. महाराष्ट्रातून आलेल्या मराठ्यांनी गोवा कदंब राजवटीत आणि त्यानंतर सावंत वाडकर भोसलेंच्या अमदानीत सत्रोजी राणे यांच्या नेतृत्वाखाली क्रूररित्या मेशे आणि शेबर या आदिम समाजाला संपवण्यात आले.

पोर्तुगीजांच्या काळात राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेला केरी गाब मोझासोच्या रूपात अधिपत्याखाली आला. सातेरी, केळवायच्या मंदिरापासून काही अंतराबर एका टेकडीवर राणे यांचा प्रशस्त बाड़ा आहे. सत्रोनो रागे सरदेसाई यांनी या घराण्याला लौकिक मिळवून दिल्याचे मानले जाते. या घराण्याने पोर्तुगीज राजवटी विरुद्ध अनेक उठाव केले. यात ग्रामीण लोकांनी देखील त्यांना साथ दिली.

शस्त्र सज्ज राणे यांच्या त्याकाळी बराच दबदवा होता, जेव्हा टिपू सुलतानने सड्याचा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा सडेकर देसाई रक्षणासाठी चोर्ला घाटातून केरीला राणे यांच्याकडे आश्रयाला आले. २६ जानेवारी १८५२ मध्ये नाणसाचा किल्ला जिंकून पोर्तुगीज सत्तेला कडवे आव्हान देणारे दीपाजी राणे हे केरीच्या राणे घराण्याशी निगडीत होते. केरीतील सातेरी केळयाप मंदिराच्या परिसरात आढळलेल्या सप्तमातृका आणि गुळ्ळे येथील कदंब राजचिन्हांनी अलंकृत असलेल्या गजलक्ष्मी यावरून शिवचित्त पेरमाही देव राजाच्या काळात केरी हा गजबजलेला गाव असला पाहिजे.

केरी हे ग्राम नाम कन्नड शब्द करी पाचा अर्थ पाण्याचे तळे किया जलाशय असा होतो. गावातील मंदिरासमोर असलेला तलाव ग्रामनामाची प्रचिती करून देतो. गोव्यात एकूण केरी नाजाचे सात गावे आहेत. हे सर्वच गाव पाण्याने स्वयंपूर्ण किंवा पाण्याच्या ठिकाणी वसलेले आहेत. डोंगररांगात वसलेल्या प्रदेशाला केरी, अशो संज्ञा दिली जाते, असे तज्ज्ञांचे मत आहे. चांभारकोड येथील कष्टकरी लोक आज महाराष्ट्रात स्थलांतरित झाले.

ते फेरकर असे आडनाव लावतात, सातेरी, गजलक्ष्मी, केळयाप, ब्राहाणी, म्हाळसा, याचबरोबर वाडकर, घाडक्स, रामबस, बेोवस, कुळकार, बेताळ, म्हारिंगण ही लोक दैवते तसेच अवश्य स्वरूपात वावरत असलेला आजोबा, काळासती यांनी केरी गावाचा लोकधर्म समृद्ध केलेला आहे. आदिलशहाच्या काळापासून असलेली मुस्लिम लोकवस्ती केरीच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्वपूर्ण भाग आहे. कळटरी नदीवर असलेली पिराची कोण इथल्या पिरपरंपरेची आणि हिंद-मुस्लिम एकात्मतेच्या उरुसाची आठवणी जागवतात, कळटी, कुसडी आणि चोर्टातून येणारी थोरलीन्हेंय हा बाळवंटी नदीच्या उपनद्या आहेत.

गुळ्ळे नदीवर उभारलेले हणजुगे भरण आणि त्याचे कालवे यामुळे आज केरी गावला दुतफो जलसिंचनाची सोय लाभली आहे. गादोवाडो या ठिकाणी कळटी आणि कुसडो या उपनद्या मिळतात. हा भूभाग फुरशी प्रकारच्या सार्पासाठी उत्तम परिसंस्था आहे. कणकीची कोण या ठिकाणी कदंब भरपूर झाडे आहेत.

वामेरी, बोळोरियो टेंब, बाय डोंगर, बालट्याची डोंगर, कट्टार, मिठाशीर, घामोखिण, माट्टीचा डोंगर, बोकाड सडो, पन्नासरदार डोंगर, माडन, वाघ पेड, बिरामण्याचो डोंगर, असे एकापेक्षा एक सरस डोंगर या गावचे खरे वैभव आहे आजोबाची राय, बलद्याची राय, कोमाची, पिशाची, बोरा मणाची, माऊलीची राय या देवराया प्रसिद्ध असून निसर्गपूजन परंपरेचे उत्तम उदाहरण आहेत. येथील जंगल हे सर्पगरूडाचे निवासस्थान आहे.

Keri Sattari Goa
Jalgaon Crime News | भुसावळ हादरले! 'गावात कार का आणली?' म्हणत तरुणाला बेदम चोप; मदतीला गेलेल्या पोलिसाचाही शर्ट फाडला

पट्टेरी वाघ, बिबटा, गवारेडा, भेकर, पिसय, शेकरू, शेरगो, बामुट या जंगली स्वापदांचे ते निवासस्थान आहे. त्यासोबतच धनेश, गरुड हे घनदाट जंगलाच्या ठिकाणी सापडणारे पक्षी इथे पहावयास मिळतात. श्री सातेरी देवी ही केरी गावची मुख्य देवता आहे. येथील हिंदू मुस्लिम लोक आजोबाचे अदिमभक्त आहेत. कठीण वेळेत आजोबाला साकडे घालण्यात हिंदू असो का मुस्लिम कोणच दुसरा विचार करत नाहीत. येथील वीरगळ गारातील शिकारीला जाण्याच्या प्रथेला दर्शवतो.

काळासती नावाची सतीशीळा चंदनाच्या झाडाखाली स्थापित केलेली आहे. या गावात बाटलेला वेताळ आहे. या नाथावरून पोर्तुगीजांच्या काळात देवांचे सुद्धा धर्मांतर करण्यात आले असावे, असे स्पष्ट होते, कैरी गाव निसर्गाचा समतोल राखत आधुनिक विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा वारसा जपणारा आदर्श गाव आहे. महापाषाण युगाची आठवण सांगणारे दगड देवतांच्या पाषाणी मूर्ती राबजी राणे यांची ऐतिहासिक वास्तू, भगवद् भक्तीची परंपरा जपणारा चाहेरील बाडयावरील श्री शकरानाथाश्रय मठ, विरामण्याच्या डोंगरावर असलेली पांडवांची विहीर ही सगळी सांस्कृतिक संचिते कैरीच्या गतवैभवाची साक्ष देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news