Nashik Crime News: देवळाली कॅम्प हादरले; विड्याचे पान आणण्यावरून सुनेकडून आजारी सासूचा खून

नाशिकरोड पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.
Crime
CrimePudhari
Published on: 
Updated on: 

Deolali Camp: Sick mother-in-law murdered by daughter-in-law

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा सासू- सुनेमध्ये झालेल्या किरकोळ वादामुळे ८९ वर्षीय सासूचा गळा दाबून आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे उघडकीस आली. नाशिकरोड पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.

Crime
Nashik Sinhasta Kumbh Mela : 2027 होणाऱ्या कुंभ मेळ्याची तयारी किती झाली, काय आहेत आव्हाने?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्पमधील आडकेनगर येथे शेख कुटुंबीय राहतात. घटनेच्या दिवशी मृत सकिना गफार शेख (८९) यांना खाण्यासाठी विड्याचे पान आणावे, असे सकिना यांच्या दिराने आरोपी शबाना यांना सांगितले होते. गेल्या अनेक दिवसांपासून सासू आजारी असल्याने शबाना कंटाळल्या होत्या.

Crime
Manikrao Kokate: नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी समाजाला वेठीस धरु नका, कोकाटेंचा रोख कुणाकडे?

त्यातूनच शबानाने पान आणून देण्यास नकार दिल्याने सासू- सुनेमध्ये जोरदार वाद झाले होते. संतापाच्या भरात शबाना यांनी सकिना यांचा गळा दाबला. अस्वस्थ सकिना यांना नाशिकरोड येथे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी (दि. ३) त्या मृत झाल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी शबाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. आरोपी शबाना शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.