

Nashik Sinhasta Kumbh Mela 2027 How much preparation done
राहुल रनाळकर, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर तो विशाल, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यवस्थापनाचा अद्वितीय प्रयोग आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो, कोट्यवधी भाविकांना आकर्षित करणारा सोहळा आहे. परंतु आज, २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात, अजूनही या महाकुंभासाठी आवश्यक असलेली मूलभूत कामे ठप्प आहेत. पावसाळ्यामुळे काही प्रमाणात अडथळे आले असले, तरी तयारीची कमतरता स्पष्ट जाणवत आहे.
सध्याची स्थिती : अजूनही सुरुवातच नाही गेल्या पाचा महिन्यांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बांधकाम आणि इतर प्रत्यक्ष कामांना अडथळे आले हे मान्य आहे. परंतु केवळ हवामान हे एकमेव कारण नाही. नियोजनातील विलंब, निधीची कमतरता आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव हे मुद्दे अधिक चिंताजनक आहेत. आजच्या स्थितीत, नाशिक कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कामे, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, तात्पुरत्ती निवास व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था यपैिकी अनेक कामांना अजून सुरुवातही झालेली नाही.
उदाहरणार्थ, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहापदरी सिमेटीकरण प्रस्तावित असले, तरी त्यावर अजून काम सुरू नाही. नाशिक शहरातील सीबीएस ते वॉनडा कॉर्नर या सिमेंट रस्त्याला दीड वर्ष लागले. मग त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काय? याशिवाय साधुग्राम, घाटांवरील पूल, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक शौचालये यांसारख्या कामांवर अजूनही काम सुरू होणे बाकी आहे.
सिंहस्थाचा कालावधी आणि गर्दीचे आव्हान या वेळेचा कुंभमेळा दोन उप्प्यांमध्ये होणार असून, त्याचा एकूण कालावधी तब्बल २९ महिन्यांचा असेल. या दीर्घ कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर कायमस्वरूपी दवाव राहणार आहे. दरम्यान, दोन पावसाळे येणार आहेत, जे प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यास अडथळे ठरू शकतात, अंदाजानुसार दररोज लाखो भाविक येथे येतील, मुख्य स्नानासाठी तर आकडा काही वेळा ५० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि आपात्कालीन सेवा सराज असणे आवश्यक आहे. परंतु आजार याचाचत कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नाही.
उज्जैन कुंभमेळ्याचे उदाहरण: वेळेवर कामे पूर्ण करणारी प्रणाली नाशिकनंतर म्हणजे २०२८ मध्ये उज्जैन येथे होणाच्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली कामे मात्र जवळजवळ पूर्ण होत आलेली आहेत. त्या ठिकाणीही पावसाळ्यामुळे अडथळे निर्माण झाले, तरी प्रशासनाने वेळेवर नियोजन केले, निधी वेळेवर उपलब्ध केला आणि कामांची प्रगती सातत्याने तपासली. उज्जैनमध्ये रस्ते, निवास व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी स्पष्ट वेळापत्रक तयार करण्यात आले. त्याचबरोबर स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकार यांमधील समन्वय प्रभावी असल्याचे दिसून आले. नाशिकला ही शिकवण घेणे अत्यावश्यक आहे.
कर कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर भाविकांसाठी पुढील समस्या निर्माण होऊ शकतात
वाहतुकीत अडथळे : प्रवेशद्वारांवर मोठ्या रांगा, अपघातांची शक्यता.
स्वच्छतेचा अभाव : रोगराईचा प्रसार, विशेषतः पावसाळ्यानंतर जलजन्य आजार,
पाणी आणि अत्राची टंचाई : लाखो लोकांसाठी पुरवठ्याची समस्या,
सुरक्षा धोक्यात गर्दा नियंत्रणासाठी अपुरी व्यवस्था.
पर्यावरणीय हानी: कचरा व्यवस्थापन अपुरे राहिल्यास निसर्गावर विपरीत परिणाम,
स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांचे योगदान: ज्या गोष्टींचा पावसाळ्याशी संबंध नाही, ते तरी मार्गी लागायला हवे होते. कुंभमेळा हा प्रशासनाचा एकट्याचा प्रकल्प नाही. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक संस्था, थार्मिक संघटनांनी पुढे येऊन योगदान द्यायला हवे. स्वच्छता मोहिमा, वैद्यकीय शिबिरे, वाहतूक मार्गदर्शन यांसाठी स्वयंसेवी गट तयार करणे आवश्यक आहे.
पावसाळ्याचे नियोजन आवश्यक घटक - पावसाळा हा दरवर्षीच असतो. त्याला अडथळा न मानता पर्यायी वेळापत्रक तयार करपणे गरजेचे होते. ज्या कामांसाठी हवामानावर अवलंबून राहावे लागते, त्यासाठी विशेष तांत्रिक उपाय जसे की, जलनिस्सारण, मलनिस्सारण, जलरोधक सामग्री, पूर्वतयारी करणे आवश्यक होते. किमान वेत्या पावसाळ्यात तशी तयारी ठेवावी लागेल,
नियोजनाचा अभाव : कामे कुठल्या टप्प्यावर आहेत, याचा अचूक लेखाजोखा प्रशासनाकडे नाही.
निधीचे अनियमित वाटप आर्थिक तरतूद वेळेवर होत नाही किया मंजुरी प्रक्रियेत विलंब होतो.
समन्वयाचा अभाव : विविध विभागांमध्ये संवाद कमी, स्यामुळे एकमेकांवर जराबदारी ढकलण्याची प्रवृत्ती.
तांत्रिक अहवालांचे विलंबित परीक्षण भू-सर्वेक्षण, वाहतूक योजना, पर्यावरणीय परवानग्या यांसारख्या गोष्टी वेळेवर पूर्ण नाहीत.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लोकांपर्यंत विश्वास निर्माण करणारे नेतृत्व उशिरा पुढे येते.
* टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजन
प्राथमिक टप्पा सते, पाणी, वीज, स्वच्छता
दुसरा टप्पा निवास, आरपुरवठा, आरोग्य सुविधा
तिसरा टप्पा: सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण
तातडीने प्रगती समिती स्थापन करणे : नाशिक जिल्हाधिकारी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त समितीमार्फत दर महिन्याला कामांचा आढावा घ्यावा. सध्या है सुरू आहे. पण प्रगती काही दिसत नाही.
जीआयएस (GIS) नकाशे, ड्रोन सर्वेक्षण आणि डिजिटल नियंत्रण कक्ष यांचा वापर करणे आवश्यक आहे.
निधी वेळेवर उपलब्ध करणे: निधी वितरणासाठी विशेष कुंभ निधी मंडळ स्थापन करून प्रकल्पांची आर्थिक पारदर्शकता राखावी.
जनजागृती मोहीम : भाविकांना मार्गदर्शन करणारी वेबसाइट, मोबाइल अॅप आणि हेल्पलाइन सुरू करावी.
उज्जैनचा अभ्यास करून नाशिकसाठी रोडमॅप तयार करणे : यशस्त्री प्रकल्पांचे मडिल वापरून त्यानुसार स्थानिक गरजांनुसार उपाययोजना कराव्यात,