CREDAI Nashik Metro : 'नम: नाशिक' गृहप्रदर्शनात अनेकांच्या गृहस्वप्नपूर्तीचा प्रारंभ

मंत्री दादा भुसे : प्रदर्शनात 100 कोटींची उलाढाल
नाशिक
नाशिक : 'क्रेडाई नाशिक मेट्रो' नम: नाशिक प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी बोलताना दादा भुसे. मंचावर गौरव ठक्कर, दीपक चंदे, तुषार संकलेचा, रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी आदी.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप जरी झाला तरी अनेक ग्राहकांसाठी त्यांच्या गृहस्वप्नपूर्तीचा हा खरा प्रारंभ असल्याचे कौतुकोद्गार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढले. ठक्कर डोम येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या 'क्रेडाई नाशिक मेट्रो' आयोजित नम: नाशिक गृहप्रदर्शनाचा सोमवारी (दि.१८) समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर 'म्हाडा'चे अध्यक्ष रंजन ठाकरे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, 'एक्स्पो'चे समन्वयक ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी, आय. पी. पी. कृणाल पाटील, एक्स्पो कमिटीप्रमुख मनोज खिवंसरा, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे, शामकुमार साबळे, शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दीपक चंदे उपस्थित होते.

सर्वांसाठी हक्काची घरे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून रंजन ठाकरे यांनी नियमातील त्रुटी दूर करून म्हाडाकडून सकारात्मक सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी सध्या योग्य व पोषक वातावरण असून, तुलनात्मकदृष्ट्या येथे रिअल इस्टेटचे दर कमी आहे, असे नरेंद्र कुलकर्णी म्हणाले.

नाशिक
CREDAI Nashik Metro : 'क्रेडाई' गृह प्रदर्शनाने शहराच्या अर्थकारणाला गती; 'लकी ड्रॉ'चे विजेते.. बघा नावे

मानद सचिव तुषार संकलेचा यांनी स्वागत केले. ऋषिकेश कोते यांनी आभार मानले. माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, सुरेश पाटील, अनंत राजेगावकर, किरण चव्हाण, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवि महाजन यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्रेणिक सुराणा, सचिन बागड, हंसराज देशमुख, श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी आदींनी परिश्रम घेतले.

नाशिक
CREDAI Nashik Metro : 'नम: नाशिक प्राॅपर्टीचा महाकुंभ' 40 सदनिका, 25 प्लॉटचे बुकींग

गृहप्रदर्शन अनेक कारणांनी यशस्वी झाले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र तसेच राज्यभरातील विविध शहरांतून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामुळे नाशिकची ब्रॅण्डिंग झाली. प्रदर्शनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने नाशिकमधील एकूणच अर्थकारण भविष्यात सकारात्मक होईल.

गाैरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news