CREDAI Nashik Metro : 'नम: नाशिक प्राॅपर्टीचा महाकुंभ' 40 सदनिका, 25 प्लॉटचे बुकींग

दोन दिवस शिल्लक : उदंड प्रतिसाद, स्वप्नातील घर साकारण्याची सर्वोत्तम संधी
नाशिक
नाशिक : 'नम: नाशिक प्राॅपर्टीचा महाकुंभ' प्रदर्शनाला नागरिकांनी केलेली गर्दी.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्यावतीने त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित 'नम: नाशिक-प्रॉपर्टीचा महाकुंभ' या गृह प्रदर्शनात उदंड प्रतिसाद लाभत असून, प्रदर्शन ४० सदनिकांसह २५ पेक्षा अधिक प्लॉटचे स्पॉट बुकींग झाले आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे अजून दोन दिवस शिल्लक असल्याने, नागरिकांना स्वप्नातील घर साकार करण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, लॉंग वीकेंडचा लाभ घेत अनेक ग्राहकांकडून साइट व्हिजिटचे नियोजन केले जात असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.

नाशिक
CREDAI Nashik Metro | नाशिकमध्ये स्वत:चे घर असावे... प्रत्येकाच्या स्वप्नांची होणार पूर्तता

नाशिक जिल्हा तसेच धुळे, जळगाव, अहमदनगर, मुंबई, ठाणे व पुणे येथून देखील नागरिक प्रदर्शनास भेट देत आहेत. आतापर्यंत असंख्य नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देवून, नाशिकमधील विविध भागांमधील सर्वोत्तम प्रॉपर्टीजची माहिती घेतली. या प्रदर्शनास पाचशेपेक्षा अधिक प्रॉपर्टीजचे पर्याय उपलब्ध असल्याने, नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. दरम्यान, प्रदर्शनात जनजागृतीसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या 'स्मार्ट सिटी-स्मार्ट कुंभ' या विषयावरील चर्चासत्रात इंडीयन प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमीत सिंग अरोरा व इको सोल्युशन्सच्या संचालिका डॉ. अंशुल गुजराती यांनी भाग घेतला. तसेच १६ ऑगस्ट रोजी झालेल्या 'शाश्वत शहर, शाश्वत कुंभ' या विषयावरील चर्चासत्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग व इकोफर्स्टचे राकेश भाटिया यांनी सहभाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. १८ ऑगस्ट रोजी 'पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन' या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नाशिक
CREDAI Nashik Metro | 'नम: नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ' आजपासून

पहिल्या सत्रात 'स्वच्छ हवा, पाणी व जमिनीच्या संवर्धनासाठी कमी खर्चातील सुयोग्य पर्याय' या विषयावर नॅचरल सोल्युशन्सचे संस्थापक अध्यक्ष अजित गोखले मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात बांधकाम आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून नेट झिरो इमरतीची संकल्पना या विषयावर क्लायमेटनामा प्रा. लि. संस्थापक आणि सीईओ ममता रावत या मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे, अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके आदी प्रयत्नशील आहेत.

२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आपले घर असावे अशी भावना नागरिकांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटीकडे होत असून अशा एक्स्पोमध्ये भविष्यातील नाशिकची झलक बघायला मिळते. उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्रीवर शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस आहे.

गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाला नाशिकमध्ये बळ मिळत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत घरांच्या किमती वाढू शकतात. अशात रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य व पोषक वातावरण आहे. हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे असून, येथील डोम पूर्ण वातानुकूलित आहे. प्रशस्त पार्किंग तसेच विविध ऑफर्सची रेलचेल येथे दिसून येत आहे.

ऋषिकेश कोते, समन्वयक

शहराची प्रगती व अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून, एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात. प्रदर्शनात आकर्षक स्टॉलमध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लाॅट्स, दुकाने,ऑफिसेस यांचे पाचशेपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असून आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत आहे.

नरेंद्र कुलकर्णी, समन्वयक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news