Chhagan Bhujbal On NCP Merger: माझे फक्त दोनच नेते, बाकी सगळे सहकारी पक्षीय नेते.... छगन भुजबळांचे विलिनीकरणावर सुचक वक्तव्य

छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाबाबतच्या चर्चेवर उपरोधिक भाष्य करत आम्ही टीव्ही पाहतो त्यानंतर विश्लेषण करतो असं वक्तव्य केलं.
Chhagan Bhujbal On NCP Merger
Chhagan Bhujbal On NCP Mergerpudhari
Published on: 
Updated on: 

Chhagan Bhujbal On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत सुचक वक्तव्ये केली आहेत. तसेच त्यांनी माझे दोनच नेते म्हणत चर्चेला तोंड फोडले. छगन भुजबळ यांनी सध्या सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत, अजित पवार असतानाच्या चर्चेबाबत तसेच दोन्ही पक्षांनी एकत्र आल्यानंतर एनडीए की इंडिया आघाडी याबाबत देखील भाष्य केलं.

Chhagan Bhujbal On NCP Merger
Chhagan Bhujbal : बहुचर्चित कलिना ग्रंथालय प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष

छगन भुजबळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माध्यामात दाखवत आहे मर्जर मर्जर खेळ सुरू आहे. दोन्ही बाजूंनी समान खेळ झाला पाहिजे. आमच्यातला एक जातो, चर्चा करतो क्रिकेट सुरू आहे. सगळ्यांची एकत्रितरित्या चर्चा झाली पाहिजे, तुटक तुटक चर्चा नको.'

छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाबाबतच्या चर्चेवर उपरोधिक भाष्य करत आम्ही टीव्ही पाहतो त्यानंतर विश्लेषण करतो. पवार साहेबांना मी देखील भेटायला गेला होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला जाणे चूक नाही. माझ्या आयुष्यात दोनच नेते एक बाळासाहेब ठाकरे ते आता नाहीत दुसरे शरद पवार आता दुसऱ्या पक्षात आहेत. इतर सर्व सहकारी पक्षीय नेते आहेत.

Chhagan Bhujbal On NCP Merger
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी मविआत परत आले तर ते खरे विलीनीकरण

भुजबळांनी विलिनीकरण झाल्यावर एनडीए की इंडिया आघाडी याचे देखील सुचक उत्तर देत त्याचा अजून शोध बोध झालेला नाही असं सांगत याबाबतची आपल्याला काही माहिती नाही असं भाव चेहऱ्यावर आणला. त्यांनी सुनेत्रा ताई योग्य वेळी योग्य ते सांगितलं जाईल असं म्हणाल्या आहेत. सुनेत्रा ताई आम्हाला विश्वासात घेऊन ठरवतील अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली.

Chhagan Bhujbal On NCP Merger
Parth Pawar NCP Meeting: पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आमदारांना काय विचारलं? मांडेकरांनी बाहेर येताच केला मोठा खुलासा

छगन भुजबळ यांनी जर कोणी एकत्र आले तर आनंदच आहे असं म्हणत ठाकरे एकत्र आले सगळ्यांना आनंद झाला असं उदाहरण दिलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करण्यात पवार आणि छगन भुजबळ होते बाकीचे लोक नंतर आले असे म्हणत आपण राष्ट्रवादीसाठी आपले योगदान काय ते सांगितलं. तसेच त्यांनी एकत्रीकरण झाले जुने जाणते एकत्र आले तर आनंदच होईल असं सांगितलं. माझ्या पक्षाचे नेते, आमदार, जिल्हाप्रमुख मी त्यांच्यासोबत राहीन असं देखील सांगितलं.

Chhagan Bhujbal On NCP Merger
NCP Internal Conflict : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य

भुजबळांनी पुढे विलिनीकरण दिसते तेवढे सोपे नाही असे सुचोवाच करत दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. दादा सगळ्यांना सांभाळून पुढे गेले असते. आम्ही नाही म्हटलं तरी एनडीए सोबत आहोत. पवार साहेब हे इंडिया आघाडी सोबत आहेत. पुढे कोण कोणासोबत राहणार... भाजपला विचारल्याशिवाय पाऊल टाकता येणार नाही. त्यांची संमती घ्यावीच लागेल. मुख्यमंत्री बोललेत चर्चा करावी लागेल म्हणून. त्यांना दूर ठेवून कसा निर्णय घेणार. मोठी जटील प्रश्न आहे असं म्हणत भुजबळांनी कोणताही निर्णय घेताना भाजपवर असलेलं अवलंबत्व एक प्रकारे अधोरेखित केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.