Chhagan Bhujbal: अजित पवारांकडून मलाही कृषिमंत्रिपदाची ऑफर; भुजबळांचा गौप्यस्फोट

राज्यभरात कृषिमंत्रिपद चर्चेत असतानाच भुजबळांनी केला दावा : भुजबळांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Nashik
कृषिमंत्रिपदाची ऑफर : राज्यभरात कृषिमंत्रिपद चर्चेत असतानाच भुजबळांनी केला दावा Pudhari News Network
Published on
Updated on
Summary
  • कृषीमंत्रिपदावरून माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी

  • कृषी खाते देण्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस अतंर्गत नाटय

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा मंत्री छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

Deputy Chief Minister Ajit Pawar had offered Bhujbal the responsibility of the agriculture department. Minister Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar had insisted that this department is good, big and you should take it.

नाशिक : विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करत, त्यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे. मंत्री व कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. परंतु कृषी खाते देण्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस अतंर्गत नाटयही रंगल्याचे बघावयास मिळाले.

असे असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला. भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. मंत्री भुजबळ यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nashik
Minister Chhagan Bhujbal's Claim : फडणवीसांमुळे नव्हे, मराठी भाषेमुळे उद्धव - राज एकत्र

मंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.1) नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मंत्री भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी आम्ही पहिल्यादा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजित पवार यांनी अर्थ खाते घेतले. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले.

Nashik
Chhagan Bhujbal |कोकाटेंच्या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही : छगन भुजबळ

कृषी खाते चांगले आहे, हे तुम्ही घ्या...  अजित पवार

तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खाते चांगले आहे, हे तुम्ही घ्या. असा दावा त्यांनी केला आहे. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला. पण ग्रामीण भागातील लोकांना द्या, हे मी सांगितले. कारण माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहते. पण, त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता दत्तात्रय भरणे मामा या पदाला न्याय देतील असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो. भरणे मामा यांनी काही अडचण येईल, असे वाटत नाही. प्रत्येक खाते महत्त्वाचे असते. प्रत्येक खाते हे चांगले आहे. आपण कसे काम करतो यावर ते अवलंबून असल्याचा टोलाही मंत्री भुजबळ यांनी मंत्री कोकाटे यांचे नाव न घेता लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news