Malegaon blast case: २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

२००६ च्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे.
Bombay High Court
Bombay High Courtfile photo
Published on
Updated on

Malegaon blast case

मुंबई: २००६ च्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. या आरोपींवरील दोषारोप निश्चित करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून मुक्तता केली आहे. या निकालामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली त्यांच्यावरील खटल्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे.

Bombay High Court
High Court ruling tenant eviction|मालमत्तेत हिस्सा खरेदी केल्यास भाडेकरुला घराबाहेर काढू शकत नाही : उच्च न्यायालय

लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी, मनोहर नरवारिया अशी दोषारोप रद्द केलेल्यांची नावे आहेत. मशिदीजवळ झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने हा निकाल देताना स्पष्ट केले की, संबंधित आरोपींवरील आरोप तांत्रिकदृष्ट्या टिकणारे नाहीत. तांत्रिक बाबींचा विचार करता, त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध होऊ शकत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यामुळे या चौघांचीही या भीषण स्फोट प्रकरणातून प्रभावीपणे मुक्तता झाली आहे.

Bombay High Court
Rajesh More Election Case: राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा; पराभूत उमेदवार प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली

भोंदू खरातचे कोट्यवधींचे साम्राज्य ईडी घेणार ताब्यात

नाशिकमधील दुसरे एक प्रकरण म्हणजे, तंत्र-मंत्र, अघोरी पूजा आणि समस्यांचे निवारण करण्याचे आमिष दाखवत लोकांची फसवणूक करणारा तसेच अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या साम्राज्यावर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा घावा घातला आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे त्याच्या आर्थिक व्यवहारांमधील धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

फेरीवाल्यांविरोधात हायकोर्ट ॲक्शन मोडवर

मुंबई शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांबाबत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्शन मोडवर येत कठोर भूमिका घेतली. तातडीने पोलीस बंदोबस्त घ्या आणि फेरीवाल्यांवर कारवाई करून अहवाल सादर करा असे आदेश महापालिकेला दिले. मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱ्या विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मागील आठवड्यात बुधवारी पदपथ, रस्ते तसेच चौकाचौकांत ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांच्या उपद्रवावर न्यायालयाने संताप व्यक्त केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news