Bhondu Ashok Kharat Nashik | भोंदू खरातचा नराधम चेहरा! 'मुलगा होईल' असे आमिष दाखवून गर्भवतीवर अत्याचार

Bhondu Ashok Kharat Nashik | भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. 'तुला मुलगाच होईल' असे आमिष दाखवत विधी करण्याच्या नावाखाली खरातने संबंधित महिलेचे शोषण केल्याचा आरोप आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat case: अशोक खरातचा धक्कादायक प्रताप; 'मासा ही जलवनस्पती' असल्याचे सांगून शाकाहारी भक्तांना द्यायचा खायला

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक करत आहे. तपासादरम्यान पीडित महिलेने महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर केले असून, खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीतही अनेक धक्कादायक बाबी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी खरातवर आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून, त्यासोबत आर्थिक फसवणुकीचा एक गुन्हा मिळून एकूण नऊ गुन्ह्यांचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू आहे. दरम्यान, खरातच्या जुन्या कारनाम्यांचीही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

Ashok Kharat
Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना पोलिसी दणका! नाशिकच्या नगरसेवकांचे पती रडारवर

१९८० मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्याने एका नातेवाईक महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली होती. पोलिसांच्या भीतीने खरातने गाव सोडून पळ काढला आणि तब्बल १५ वर्षे तो बेपत्ता होता. याचबरोबर स्पेशल २६ चित्रपटाच्या धर्तीवर त्याने आर्थिक फसवणुकीचे जाळे उभारल्याची माहितीही समोर आली आहे. श्रीमंत भक्तांना लक्ष्य करून त्यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी पाठवून धाड टाकण्याचे नाटक केले जात असे. त्यानंतर तडजोडीच्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व प्रकरणांमुळे नाशिकसह राज्यभर खळबळ उडाली असून, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news