Ashok Kharat case: अशोक खरातचा धक्कादायक प्रताप; 'मासा ही जलवनस्पती' असल्याचे सांगून शाकाहारी भक्तांना द्यायचा खायला

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
Ashok Kharat case
Ashok Kharat casefile photo
Published on
Updated on

Ashok Kharat case

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या भोंदूबाबाने केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर शाकाहारी भक्तांचे धर्मभ्रष्ट केल्याचेही आता समोर आले आहे. "मासा ही एक जलवनस्पती असून त्याला रक्त आणि हाडे नसतात," अशी थाप मारून त्याने अनेक शाकाहारी भक्तांना प्रसादाच्या नावाखाली चक्क मासे खाण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खरातने केवळ धार्मिक भावनांशी खेळ केला नाही, तर त्याने नाशिकमधील काही बड्या जैन धर्मीय व्यावसायिकांना देखील आपल्या जाळ्यात ओढले होते.

Ashok Kharat case
Ashok Kharat case: अशोक खरातच्या मोबाईलमध्ये २ हजारांहून अधिक नंबर 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह; तपासाचे नवे आव्हान

गर्भनिरोधक गोळ्यांसाठी दोन डॉक्टरांची चौकशी

अशोक खरातने महिलांना गर्भधारणा होऊ नये, यासाठी गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील दोन नामांकित डॉक्टरांची तपास यंत्रणेकडून चौकशी झाल्याची महिती समोर आहे. त्यापैकी एक डॉक्टर एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटरर्स आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचीही चौकशी केली जाणार आहे.

एसआयटी पथकाकडून खरात याची सलग चौकशी सुरू असून, त्यातून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. तपासादरम्यान, खरातने महिलांशी वारंवार शारीरिक संबंध ठेवूनही कोणतीही महिला गर्भवती न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तो काही औषधांचा वापर करत असल्याचा संशय बळावला आहे.

वास्तू तपासणीसाठी खरातची पाच लाखांची फी

खरात याच्या कथित कारवायांबाबत रोज नवीन धक्कादायक तपशील समोर येत असून, आता वास्तू तपासणीच्या नावाखाली तो लाखोंची उकळपट्टी करत असल्याचे उघड झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, एखादी जागा किंवा घर वास्तूच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी खरात पाच लाख रुपये फी आकारत होता. विशेष म्हणजे, ही सेवा मुख्यतः उच्चभ्रू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींमध्ये लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat case
Nashik Ashok Kharat Case | नाशिक हादरले! भोंदू खरात प्रकरणात दोन बड्या डॉक्टरांची चौकशी; राजकीय नेत्याच्या जावयाचे नाव चर्चेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news