Simhastha kumbh mela Nashik 2027 Sadhugram Land Acquisition|साधुग्रामसाठी अनावश्यक जमीन अधिग्रहण टाळा

Simhastha kumbh mela nashik 2027 | बाधित मालमत्तांचाच प्रस्तावात समावेश करण्याचे कुंभमेळा आयुक्तांचे निर्देश
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम आणि वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. साधुग्रामसाठी प्रत्यक्षात वापरात येणार नसलेल्या मालमत्तांचा अधिग्रहण आदेशात समावेश करू नये, असे स्पष्ट करत बाधित होणाऱ्या मालमत्तांचाच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

जमीन अधिग्रहणाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम आणि वाहतूक व्यवस्थेसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणातील प्रलंबित बाबींवर चर्चा केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अधिग्रहणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश दिले.

Simhastha Kumbh Mela Nashik
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

अधिग्रहित साधुग्रामसाठी करण्यात येणाऱ्या जमिनींचे क्षेत्रफळ आणि गट क्रमांक महसूल विभागाने अचूक तपासून नोंदवावेत. प्रत्यक्षात बाधित होणाऱ्या मालमत्तांचाच प्रस्तावात समावेश करावा, अशा सूचना दिल्या. प्रलंबित प्रश्नांच्या निपटाऱ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष बैठक घेण्याचेही निश्चित केले.

पार्किंग क्षेत्र निश्चित करणार

कुंभमेळ्याच्या काळातील वाहनतळासाठी महापालिका हद्दीबाहेरील जागा निश्चित करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवणार आहे. बाह्य पार्किंगसाठी स्वतंत्र सर्वेक्षणाची निविदा काढण्याची आवश्यकता नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले. जमीन अधिग्रहण करताना संपूर्ण गटाचा विचार करण्यावर भर दिला. अधिग्रहणासाठी आवश्यक भाडेपट्ट्याची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपा आणि बांधकाम विभागाला कळवावी, असेही निर्देश दिले आहेत.

Simhastha Kumbh Mela Nashik
Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भुसावळ रेल्वे विभागाचे 'मेगा प्लॅनिंग'; नाशिक परिसरातील पाच स्थानकांचा १,६३० कोटींचा कायापालट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.