विधानसभा 2024 | व्यक्तिकेंद्रित निवडणूक अध्याय यावेळीही अव्याहत?

Assembly Election 2024 | व्यक्तिकेंद्रित निवडणूक अध्याय यावेळीही अव्याहत?
सिन्नर विधानसभा मतदारसंघा
सिन्नर विधानसभा मतदारसंघPudhari news network
Published on
Updated on
सिन्नर : संदीप भोर

सिन्नर विधानसभा मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 अशा तीन निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे व त्यांचे सुपुत्र राजाभाऊ वाजे अशी ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळाली. अशीच सरळ लढत आगामी निवडणुकीतही होईल, अशी चिन्हे असताना अनपेक्षितपणे राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीची नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. त्यामुळे आता कोकाटे विरुद्ध वाजे हा थेट सामना होणार नसल्याचे दिसते. कितीही पडझड झाली तरी नव्या दमाने राजकीय आखाडा गाजविण्याची क्षमता असलेल्या आमदार कोकाटे यांच्यासमोर उमेदवार कोण? हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.

Summary
  • काँग्रेस पक्षाची मतदारसंघात फार ताकद नसली तरी कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे या जागेची मागणी केली आहे. तालुकाध्यक्ष विनायक सांगळे हे आमचे उमेदवार असतील, असाही दावा त्यांनी केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

  • विद्यमान आमदार कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. त्यामुळे युतीची जागा अजित पवार गटाकडे राहील, अशी कल्पना असतनाही भाजप स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंत आव्हाड यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. शिंदे गटाकडे वजनदार उमेदवार नाही, हे सध्याचे चित्र स्पष्ट दिसते. स्वराज्य पक्षात प्रविष्ट झालेले शरद शिंदे यांनीही उमेदवारीची तयारी चालवली आहे.

राजाभाऊ वाजे दिल्लीत गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील अनेक इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले आहेत. खासदार वाजे आपल्या डोक्यावर हात ठेवतील म्हणजे विजयाचे गणित जुळविण्यास सोपे जाईल, अशी धारणा मनात धरून तब्बल अर्धा डझन इच्छुक असल्याचे चित्र आहे.

सह्याद्री युवा मंचचे संस्थापक, उदय सांगळे यांनी विधानसभेची निवडणूक लढायचीच, असा चंग बांधला आहे त्यादृष्टीने मतदारसंघात विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मधल्या काळात शिंदे गटाशी जवळीक साधून असले तरी ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. याबाबत खुद्द सांगळे यांनीच मध्यंतरी खुलासा केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो. असे असले तरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येदेखील सिन्नरची जागा लढविण्यासाठी रस्सीखेच दिसते. पक्षनिहाय इच्छुकांचा अंदाज घेतल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार कै. सूर्यभान गडाख यांचे सुपुत्र राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती डॉ. रवींद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संजय सोनवणे आदींनी मतदारसंघात जोरबैठकांचा धडाका लावला आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघा
विधानसभा 2024 | काँग्रेस गड राखणार की महायुती बाजी मारणार?

संयमी भूमिका कोकाटेंना लाभदायी?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना सुमारे 1 लाख 61 हजार तर हेमंत गोडसे यांना केवळ 30 हजारांच्या आसपास मते मिळाली. त्याच अनुषंगाने राजाभाऊ वाजे कट्टर विरोधक असले तरी आमदार कोकाटे यांनी संयमी भूमिका घेतल्याने खासदार वाजे यांना मोठे मताधिक्क्य मिळविता आल्याची चर्चाही रंगली. राजाभाऊंना लोकसभेची वाट मोकळी करताना आमदार कोकाटे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाची वाट सुकर केल्याचीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतील संयमी भूमिकेचा त्यांना फायदा होणार का? असेही चर्वितचर्वण सिन्नरच्या राजकीय पटलावर सुरू आहे.

भारत कोकाटे - जरांगे भेट!

आमदार कोकाटे यांचे बंधू मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी नुकतीच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. ते सध्या ठाकरेंच्या सेनेत आहेत. जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास कोकाटे सिन्नर मतदारसंघातून इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघा
विधानसभा 2024 | भाजपकडून इच्छुक उदंड; मविआकडून कोण थोपटणार दंड?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news