विधानसभा 2024 | भाजपकडून इच्छुक उदंड; मविआकडून कोण थोपटणार दंड?

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ : भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता
विधानसभा 2024
मिशन विधानसभा 2024pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

महायुती आणि महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार केल्याने, राज्यातील जवळपास सर्वच मतदासंघांत उमेदवारीवरून संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत. त्यास नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघही अपवाद नसून, या मतदारसंघात उमेदवारीवरून मविआत 'मिठाचा खडा' पडण्याची तर, महायुतीत काहीसे 'आलबेल' असले तरी, भाजपकडून इच्छुक उदंड असल्याने, विशेषत: भाजपसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Summary

२०१९ निवडणुकीतील स्थिती

  • सीमा हिरे (भाजप) - ७८,०४१ (विजयी)

  • डॉ. अपूर्व हिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) - ६८,२९५ (पराभूत)

  • दिलीप दातीर (मनसे) - २५,५०१

  • डॉ. धोंडीराम कराड (माकप) - २२,६५७

कामगार बहुल असलेला हा मतदारसंघ निर्मितीपासून कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला म्हणून नव्हे तर लाटेवर स्वार झालेल्या उमेदवारांना संधी देणारा ठरला आहे. २००९ ला राज ठाकरेंचा करिष्मा चालला अन् नितीन भोसले यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. २०१४ आणि २०१९ मधील मोदी लाटेत भाजपच्या सीमा हिरे यांना आमदारकीची संधी दिली. मविआकडून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जाहीर झालेली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितीन भोसले, अपूर्व हिरे हेदेखील उमेदवारीसाठी दावा ठोकून आहेत. नाना महाले यांचेही नाव अधुनमधून चर्चिले जात असल्याने शरद पवार गट उमेदवारीसाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मविआचा घटक पक्ष होऊ इच्छिणाऱ्या माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी मतदारसंघात 'भावी आमदार' अशी होर्डिंग्जबाजी करीत, निवडणुकीसाठी दंड थोपटल्याने, आघाडीत बिघाडी होऊ न देण्याची मोठी जबाबदारी नेत्यांवर असणार आहे.

विधानसभा 2024
Nashik Political News | इच्छुक झाले फार, साऱ्यांचाच 'मध्य'वर भार !

यंदा पक्षांतर्गत विरोधामुळे भाजप आमदार हिरे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. भाजपकडून आतापर्यंंत ११ इच्छुकांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव, दिनकर पाटील, दिलीप भामरे, धनंजय बेळे, प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती भाजपमध्ये बघावयास मिळत आहे. अशात भाजप 'डॅमेज कंट्रोल' कशा पद्धतीने करणार? याकडे लक्ष लागून आहे.

लाटेवर स्वार होऊन नेतृत्त्वाची संधी

पश्चिम विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसे व त्यानंतर दोन्ही पंचवार्षिक (२०१४, २०१९) निवडणुकांत भाजपने कमळ फुलवले आहे. आैद्योगिक वसाहत व खानदेश पट्ट्याचा म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात आतापर्यंत लाटेवर नेतृत्वाची संधी दिल्याचा इतिहास आहे. प्रारंभी राज ठाकरे व नंतरच्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजपने बाजी मारली असली तरी, यावेळी मात्र तशी स्थिती नाही.

मनसे, वंचितही आखाड्यात

महायुती, मविआला कडवे आव्हान देण्यासाठी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मनसेकडून शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, सलीम शेख यांची तर वंचितकडून महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांची नावे पुढे आली आहेत.तर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यास करण गायकर या मतदारसंघातून उतरण्याची शक्यता आहे.

भाजपला अपेक्षा

या मतदारसंघात तत्कालीन भाजप-शिवसेना युतीचे ४२ पैकी ३८ नगरसेवक होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती उमदेवार हेमंत गोडसे यांना इथून सर्वाधिक एक लाख चार हजार मते मिळाल्याने भाजप इच्छुकांचे हौसले अजूनच बुलंद झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news