Ashok Kharat Nashik Scam | मंत्र-तंत्राचा बनाव अन् कोट्यवधींचा डल्ला! भोंदू बाबा अशोक खरातचे औद्योगिक 'साम्राज्य' उघड

Ashok Kharat Nashik Scam | सिन्नर, माळेगावसह अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये गुंतवणूक
Ashok Kharat Nashik
Ashok Kharat NashikPudhari
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

आध्यात्मिक शक्तीचा डामडौल आणि मंत्र-तंत्राचा बनाव करून अनेक महिलांचे शारीरिक शोषण करणाऱ्या अशोक थोरात याने वेगवेगळ्या क्षेत्रातून कोट्यवधींची माया जमविली आहे. त्याच्या व त्याच्या नातेवाइकांच्या नावे आतापर्यंत अनेक जमिनी, मालमत्ता असल्याचे समोर आले असून, त्याने औद्योगिक क्षेत्रातदेखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

Ashok Kharat Nashik
Goa Road Accident | हेल्मेट घालूनही 57 टक्के दुचाकीस्वारांचा मृत्यू! गोव्यातील रस्ते अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी

अनेक बड्या उद्योजकांसमवेत त्याने सित्रर आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीत भागीदारीत उद्योग थाटल्याचे समजते. काही उद्योजकच त्याच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टवर पदाधिकारी असल्याने, त्यांना हाताशी धरून त्याने उद्योग क्षेत्रात कोट्यवधी रुपये गुंतवल्याचा संशय असून, पोलिस त्या दृष्टीने आता तपास करीत आहेत.

खरातने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी अनेक जमिनी हडपल्या. काहींवर अवैध कब्जा देखील त्याने केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. पाथर्डी-गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी-ओझर पट्टयात त्याने कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

तसेच त्याने सिन्नर आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मोठ्या कंपन्यांमध्ये देखील भागीदारीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी त्याने नाशिक आणि सिन्नरमधील बड्या उद्योजकांना हाताशी धरून ही सर्व गुंतवणूक केली आहे. त्याने नातेवाइकांच्या नावे एमआयडीसीकडून भूखंड देखील प्राप्त केले आहेत.

या भूखंडांवर त्याने उद्योग थाटल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याने ही गुंतवणूक नेमकी कोणाच्या पैशातून केली आणि त्यात कोणत्या बड्या हस्तींचे हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. पोलिसांनी खरात याच्याकडून मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सध्या सुरू आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसांत खरातला या काळ्या कृत्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांची पोलिसांकडून धरपकड केली जाणार आहे. तसेच त्याला कोण मदत करत होते, याचाही पोलिस तपास करीत आहेत. बँकांचे व्यवहार आणि काळ्या पैशांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, यात अनेक बड़े नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, खरातचे कारनामे समोर येत असल्याने, त्याच्याशी संबंधित उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.

२००९ पासून उद्योजक सोबत

आपल्या काळ्या कृत्याचे दुकान थाटण्यासाठी अशोक खरात याने २००९ मध्ये सिन्नर तालुक्यात मीरगाव येथे श्री शिवनिका संस्थान ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या स्थापनेपासून सिन्नरमधील काही बडे उद्योजक ट्रस्टच्या प्रमुख पदांवर कार्यरत होते. २००९ ते २०२५ पर्यंत हे उद्योजक ट्रस्टवर पदाधिकारी होते.

Ashok Kharat Nashik
Bicholim Water Supply Issue 2026 | डिचोलीची तहान भागणार! पुढील 30 वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचा 'मास्टर प्लॅन' तयार

या उद्योजकांना हाताशी धरून खरात याने उद्योग क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिसांकडून याबाबतची माहिती घेतली जात असून, लवकरच या उद्योजकांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

उद्योजकांनाही गंडविले

खरातने काही उद्योजकांनाही गंडविल्याची माहिती समोर येत आहे. हे उद्योजक खरातच्या पाशात अडकल्यानंतर त्याने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. मात्र, खरातकडे मोठमोठ्या नेत्यांचा तसेच मंत्र्यांचा राबता असल्याने, बदनामीच्या भीतीने या उद्योजकांनी फसवणुकीची कुठे वाच्यता केली नाही. सध्या खरात पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने, फसवणूक झालेले उद्योजक पुढे येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news