TCS Nashik Case | नाशिक टीसीएस प्रकरणाला 'टेरर' वळण! एसआयटी कोठडीत एटीएसची एन्ट्री; रझा अन् शफीची 4 तास चौकशी

TCS Nashik Case | टेररर कनेक्शन : टीसीएस प्रकरणाची वाढली व्याप्ती
TCS Nashik Case
TCS Nashik Case
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणाला टेररर कनेक्शनचे वळण मिळाल्याने शुक्रवारी (दि. १७) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एसआयटीच्या कोठडीत असलेल्या रझा मेनन आणि शफी शेख या दोघा संशयितांची ४ तास चौकशी केली.

TCS Nashik Case
Nashik ZP Gram Sevak Suspension | समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल; ग्रामसेवकाचे निलंबन

मुख्य संशयित एचआर मॅनेजर निदा खान हिचा दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन शाहिद हिच्याशी संपर्क असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर याप्रकरणात एटीएसची एंट्री झाली आहे.

महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबतच्या ९ गुन्ह्यांचा तपास सध्या एसआयटी करत आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. मागील २२ दिवसापासून पोलिसांना गुंगारा देणारी मुख्य संशयित आरोपी निदा खान हिचे टेरर कनेक्शन उघड झाल्याने, एटीएस मार्फत आता तपास केला जात आहे.

TCS Nashik Case
Nida Khan case |निदा खानची हकालपट्टी; ‘टीसीएस’चे पत्र जारी

एटीएसच्या पथकाने शुक्रवारी (दि.१७) एसआयटीच्या पोलिस कोठडीत असलेल्या रझा मेनन आणि शफी शेख यांची ४ तास चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. एटीएसने या दोघाही संशयितांवर प्रश्नांची सरबत्ती करत काही महत्त्वाची माहिती हस्तगत केल्याचे समजते. एटीएसकडून संशयितांचा सीडीआर रिपोर्ट आणि काही कागदपत्रे तपासली जाणार आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन शाहिद हिच्या संपर्कात असलेल्या निदा खान हिला ताब्यात घेतल्यानंतर अनेक खळबळजनक खुलासे होणार आहेत.

दोघांचे मोबाइल जप्त

एटीएसने रझा मेनन आणि शफी शेख या दोन्ही संशयितांचे मोबाइल जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार आहे. ते नेमके कोणाच्या संपर्कात होते याचा शोध घेतला जाणार आहे. दोन्ही संशयितांचे टेररर कनेक्शन होते काय, यादृष्टीने तपास केला जात आहे. दोन्ही संशयितांची पोलिस कोठडी शनिवारी (दि. १८) संपणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news