ashok kharat health news: लोकांना 'बरं' करणाऱ्या अशोक खरातला गंभीर आजार.... ७ किलो वजन झालं कमी, त्यात १४ वा गुन्हा दाखल

ashok kharat health news
ashok kharat health newspudhari
Published on
Updated on

ashok kharat health news: महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदू बाबा अशोक खरातचे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या अशोक खरातचा नवा प्रताप आता समोर आला असून त्यानं मोठी आर्थिक फसवणूक देखील केल्याचं समोर आलं आहे. कांदा व्यापाऱ्याची तब्बल ८५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप खरातवर करण्यात आला आहे. त्याने ६५ लाखांचा फ्लॅट फक्त २२ लाखात खरेदी केल्याचा आरोप होत आहे. अनेक गंभीर गुन्ह्यात आत असलेला खरात हा अनेक गंभीर आजारांनी देखील त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे.

ashok kharat health news
Ashok Kharat Nashik Case | खरात प्रकरणात चाकणकरांची 'दलाला'ची भूमिका

14 वा गुन्हा दाखल

भोंदू बाबा अशोक खरातने गुंतवणुकीचं अमिष दाखवून ही फसणवणूक केली आहे. तसेच तो मी देवाचा माणूस आहे जर तगादा लावला तर कोप होईल अशी धमकी देखील तो देत होता. या प्रकरणी खरातविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील १२ वा तर राज्यातील हा त्याच्यावरचा १४ वा गुन्हा आहे.

ashok kharat health news
Ashok Kharat Case | विदेशी पूजांच्या नावाखाली खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा

गंभीर आजारांनी त्रस्त

दरम्यान, अशोक खरात हा वेगवेगळ्या गुन्ह्याच्या आरोपाखाली सध्या पोलीस कोठडीत आहे. नुकतेच न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जेलमध्ये असलेल्या खरातचे तब्बल ७ किलो वजन कमी झाले आहे. अवघ्या १६ दिवसात त्याचे ७ किलो वजन कमी झाले आहे. अशोक खरात हा दिवसभरात डझनभर औषधाच्या गोळ्या खातोय.

अशोक खरातला बीपी, शुगर पॅरेलिसिस या सारख्या गंभीर आजाराने तो ग्रस्त आहे अशी माहिती मिळत आहे. पॅरालिसिसमुळं त्याला आपला हात सरळ वर देखील करता येत नाहीये. भक्तांचा आजार बरा करण्याचा दावा करणारा खरात स्वतःच गंभीर आजारानं त्रस्त आहे. अनेक नागरिक कर्माची फळं भोगतोय अशी चर्चा सुरू आहे.

ashok kharat health news
Ashok Kharat case: खरात प्रकरणातील महिला अधिकारी अजूनही परदेशात ?

दमानियांना अटक करा.. राजकारण तापलं

दरम्यन, खरात प्रकरणाची राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत. प्रकाश महाजन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरूद्ध आक्रमक झाले असून त्यांनी अजंली दमानियांनाच अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. खराचे सीडीआर अंजली दमानियांकडे कसे आले असा सवाल देखील त्यांनी केला आहे. त्यामुळं दमानिया यांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news