Ashok Kharat Case | विदेशी पूजांच्या नावाखाली खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी गंभीर आरोप समोर येत असून, विदेशात धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Nashik
Ashok Kharat NashikPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी गंभीर आरोप समोर येत असून, विदेशात धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, धार्मिक विधी आणि विशेष पूजांच्या आमिषाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Ashok Kharat Nashik
Ashok Kharat Case | नाशिकच्या 'भोंदू' बाबाच्या भक्तीत आमदार पत्नीही? अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

या प्रकरणात क्राइम ब्रांच युनिट क्रमांक एक येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दिनांक २४ ला न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकिलांकडून नरबळीचा संशय व्यक्त केला गेला होता. या दृष्टीनेही एसआयटीकडून तपास सुरू आहे.

या संबंधात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कुठली घटना घडली आहे का? याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी पोलिस यंत्रणेने सुरुवात केली आहे. भोंद खरातला महिला लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, शासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, त्याचे नेतृत्व अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा विविध पैलूंवर सखोल चौकशी करत आहे. एसआयटीच्या तपासात आता खरातच्या शिवनिका ट्रस्टशी संबंधित विश्वस्तांना समन्स देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते. ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली झालेल्या व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे.

याशिवाय, खरातशी संबंधित मालमत्तांचा मागोवा घेण्यासाठी विदेशातही पोलिस पथक पाठविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याचबरोबर व्हायरल व्हिडिओमधील पीडितांचा शोध सुरू आहे ज्यांची ओळख पटली आहे

Ashok Kharat Nashik
Nashik MHADA Scam | 'म्हाडा' घोटाळाप्रकरणी अहवालानंतर गुन्हा दाखल

त्या पीडित महिलांचा जाब जबाब घेणे सुरू आहे. तपासादरम्यान खरातच्या जीवनशैलीबाबत धक्कादायक बाबी समोर येत असून, देशाबाहेरही त्याचे जाळे विस्तारले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

परदेशात आयोजित धार्मिक विधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे भोंदू खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news