Ashok Kharat case: खरात प्रकरणातील महिला अधिकारी अजूनही परदेशात ?

भोंद खरात प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचे नाव सुरुवातीपासून चर्चेत आहे.
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

Ashok Kharat case

नाशिक : भोंद खरात प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचे नाव सुरुवातीपासून चर्चेत आहे. संबंधित महिला अधिकारी सध्या परदेशात असल्याचे समोर आले असून, त्या नेमक्या केव्हा परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

परदेश दौऱ्याच्या बाबतीत कालावधी स्पष्ट असतो, मात्र या प्रकरणात दोन महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतरही त्यांच्या परतीबाबत अनिश्चितता कायम असल्याने संशय अधिक गडद होत आहे. भोंदू अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत असून, या प्रकरणाची व्याप्ती आता उच्चभ्रू वर्तुळापर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.

विशेष तपास पथक (एसआयटी) कडून सुरू असलेल्या चौकशीत काही राजकीय, शासकीय तसेच उच्चभ्रू कुटुंबातील महिलांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यातील काही महिलांची चौकशी करण्यात येत असून, त्यांना जर शोषण झाले असेल तर पुढे येऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case | विदेशी पूजांच्या नावाखाली खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा

तपास यंत्रणांकडून व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधील तसेच इतर माध्यमांतून समोर आलेल्या संभाव्य पीडित महिलांचा शोध घेतला जात आहे. त्यांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही महिलांनी अनौपचारिकरीत्या माहिती दिल्याचे समजते, तर अनेक जणी अजूनही पुढे येण्यास कचरतात. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी अधिकाऱ्यांचा समावेश आहे काय? याबाबत तपास यंत्रणा कसून शोध घेत आहे. प्रारंभी काही अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरु होती. त्यामुळे यातील कोणाची नावे पुढे येतात हे पहावे लागणार आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case | शालार्थ आयडी घोटाळ्यातही भोंदू अशोक खरातचा हात?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news