Ashok Kharat Health Update: मळमळ, उलटी अन् डोकेदुखी... तपासावेळी भोंदू खरातची प्रकृती बिघडली; थेट कार्डियाक ॲम्बुलन्स बोलवली

Ashok Kharat Health Update
Ashok Kharat Health Updatepudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Health Update: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातची महिलांवर लैंगिक अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रींग प्रकरणी SIT कडून चौकशी सुरू आहे. मात्र या चौकशीदरम्यानच अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलवून भोंदू अशोक खरातची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Ashok Kharat Health Update
Ashok Kharat Nashik Case | खरात प्रकरणात चाकणकरांची 'दलाला'ची भूमिका

चौकशी सुरू असतानाच तब्येत बिघडली

एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरू असतानाच अशोक खरातच्या छातीत दुखू लागलं. त्याला काही काळ ऑक्सिजनवर ठेवल्याची देखील बातमी आहे. अशोक खरातला चौकशी सुरू होताच डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याचं सूत्रांकडून समजतंय.

Ashok Kharat Health Update
Ashok Kharat case: अशोक खरातचा धक्कादायक प्रताप; 'मासा ही जलवनस्पती' असल्याचे सांगून शाकाहारी भक्तांना द्यायचा खायला

प्राथमिक उपचार

यानंतर वैद्यकीय पथक बोलवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच खरातच्या वकिलांनी खरातची न्यूरोसर्जनकडे तपासणी करण्याची मागणी केली होती. आता भोंदू बाबा खरातची प्रकृती बिघडल्यामुळं एसआयटीच्या तपास प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Health Update
Ashok Kharat case: खरात प्रकरणातील महिला अधिकारी अजूनही परदेशात ?

शेळकेंचा मृत्यू अन् खरातची प्रकृती...

दरम्यान, अशोक खरातने माझा आता तुरूंगातच मृत्यू होणार माझा अंत जवळ आला आहे असं वक्तव्य केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला होता. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Ashok Kharat Health Update
Ashok Kharat Case | पंचवटीतील 'त्या' बड्या डॉक्टरचे भोंदू बाबाशी काय कनेक्शन? लैंगिक शोषणात वैद्यकीय मदतीचा संशय

तपासाची चक्रे वेगाने फरत आहेत

या मृत्यूभोवती घातपाताचे ढग दाटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी ज्या प्रकारे कंटेनरला शेळके यांची गाडी मागून धडकली ते पाहता हा घातपात असल्याची दाट शक्यता बोलून दाखवली होती.

अशोक खरात प्रकरणी तपासाला वेग आला असून नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल ६ तास चौकशी करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news