

भोंद खरात याच्या भूतकाळाबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून, त्याच्या शिक्षणापासून ते स्वतःच्या प्रतिमेपर्यंत सर्वच बाबतीत मोठी दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, खरात हा दहावी परीक्षेत नापास झाला होता आणि विशेषतः गणित विषयात तो अपयशी ठरला होता.
इतक्या मर्यादित शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही, त्याने समाजात स्वतःची प्रतिमा अत्यंत वेगळ्या पद्धतीने उभी केली. गणितासारख्या मूलभूत विषयात अपयश आलेल्या व्यक्तीने पुढे अंकशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या विषयाचा अभ्यास केल्याचा दावा करणे, यामुळे त्याच्या कथित ज्ञानाबाबत शंका निर्माण होत आहे. 'अंकशास्त्र' हा विषय संख्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित असून, त्यासाठी गणिताचे मूलभूत ज्ञान आवश्यक मानले जाते.
अशा परिस्थितीत, गणितातच अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अंकशास्त्रात प्रावीण्य मिळवले असल्याचा दावा करणे हे संशयास्पद ठरत आहे. याचाच अर्थ, खरातने स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटे दावे केल्याची शक्यता अधिक बळावली आहे. भोंदू खरातने स्वतः कडे दैवीशक्ती असल्याचे भासवून, तसेच ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांमध्ये पारंगत असल्याचा आभास निर्माण करून अनेकांना 4: 8 4 7 7 6 20 3 3 17 92 7 44 28 8 प्रभावित केले. त्याच्या बोलण्यातील आत्मविश्वास, धार्मिक आव आणणारी शैली आणि तथाकथित भविष्यवाणी यामुळे अनेक सामान्य नागरिक त्याच्या जाळ्यात अडकले.
घर सोडल्यानंतर सुमारे २२ वर्षे तो एका व्यापारी जहाजावर खलाशी म्हणून कार्यरत होता. या काळात विविध देशांतील लोकांशी संपर्क आल्याने आणि वेगवेगळ्या वातावरणात राहिल्याने त्याला इंग्रजीसह इतर परदेशी भाषांचे ज्ञान आत्मसात झाले. प्रत्यक्षात, एखादी व्यक्ती ज्या वातावरणात दीर्घकाळ राहते, त्या ठिकाणची भाषा आणि संस्कृती आपोआप आत्मसात होते. याच प्रक्रियेतून खरात इंग्रजी बोलू लागला आणि त्याने त्या कौशल्याचा वापर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी केला.
मात्र, या भाषाज्ञानाच्या जोरावर त्याने स्वतःच्या नावापुढे 'कॅप्टन' ही सन्मानाची पदवी लावून समाजाची दिशाभूल केली. कोणत्याही अधिकृत पदाचा किंवा सन्मानाचा अधिकार नसताना, अशा प्रकारे पदवी वापरणे हे त्या सन्मानाचाही अपमान असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे, तर तो स्वतःला सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी म्हणूनही मिरवत होता, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्याच्याबद्दल विश्वास निर्माण होत होता. या सर्व प्रकारातून खरातने बनावट प्रतिमा उभी करून समाजात प्रभाव निर्माण केल्याचे दिसून येते.