Ashok Kharat ED Case | भोंदू अशोक खरातचे 300 कोटींचे व्यवहार उघड

Ashok Kharat ED Case | पुणे-नाशिकच्या बिल्डर कनेक्शनवर संशय
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस येत असून, तब्बल ३०० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचे कनेक्शन समोर आले आहे. या व्यवहारामध्ये पुण्यातील एका नामांकित बिल्डरसह आणखी चार जणांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

Ashok Kharat Case
Aaple Sarkar Portal Services | संस्थांची नोंदणी आणि सावकारी परवाना आता ऑनलाइनच !

त्यामुळे हे व्यवहार नाशिकमधील की पुण्यातील याबाबत आता तर्क-वितर्वांना उधाण आले आहे. नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असल्याने या व्यवहारांची नेमकी व्याप्ती काय, याचा तपास सुरू आहे.

तपास यंत्रणांकडून या व्यवहारातील पैशांचा स्रोत आणि त्याचे मार्ग याचा सखोल शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे आता आंतरराज्य आर्थिक गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट होत असून, तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

Ashok Kharat Case
Anjali Damania Allegations | अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी व त्यानंतरही समता पतसंस्थेत मोठे आर्थिक व्यवहार !

अशोक खरातने अध्यात्माच्या नावाखाली तब्बल १,५०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात १५ गुन्हे दाखल झाले असून, तपास केंद्रीय यंत्रणांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

खरातविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल

अखेर ईडीने सोमवारी भोंदू खरातविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. यामुळे खरातवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. यातील ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा केल्याशी संबंधित आहेत. इतर ५ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. ईडीने त्याच्या आर्थिक साम्राज्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले असून या अनुषंगाने काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news