Aaple Sarkar Portal Services | संस्थांची नोंदणी आणि सावकारी परवाना आता ऑनलाइनच !

Aaple Sarkar Portal Services | सहकार क्षेत्रात डिजिटल क्रांती : ऑफलाइन अर्ज न स्वीकारण्याच्या सूचना
Aaple Sarkar Seva Kendra
Aaple Sarkar Seva KendraPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सहकार क्षेत्रात देशभरात आघाडीवर असून, आता या विभागाने प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांची नोंदणी, सावकारी परवाना मिळविणे आणि त्याचे नूतनीकरण करणे या सेवा आता पूर्णपणे आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Aaple Sarkar Seva Kendra
Ashok Kharat case | भोंदू अशोक खरातचे 300 कोटींचे व्यवहार उघड

या सेवांसाठी आता ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे कडक निर्देश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिले आहेत. देशात सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून, सुमारे दोन लाखांहून अधिक सहकारी संस्थांचे जाळे राज्यात कार्यरत आहे.

या सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सहकार विभागाने वेळोवेळी पावले उचलेली आहेत. याचाच पुढील भाग म्हणून विभागाने संस्थांची नोंदणी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेत कात टाकली आहे.

केवळ संस्थांची नोंदणी ऑनलाइन केली नाही, तर नोंदणीसह सावकारी परवाना देणे, नूतनीकरण सेवांचाही समावेश यात केला आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे सहकार क्षेत्रातील कामात मोठी सुधारणा होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हज अधिनियम २०१५ अंतर्गत सहकार विभागाच्या पाच सेवा अधिसूचित आहेत.

त्यापैकी महत्त्वाच्या सेवा आता ऑनलाइन प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि तालुका सहायक उपनिबंधकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, नागरिकांनी दिलेले ऑफलाइन अर्ज स्वीकारू नयेत. aaplesarkar.mahaonline. gov.in या संकेतस्थळावरूनच अर्ज करता येतील.

Aaple Sarkar Seva Kendra
Nashik fraud: देवळ्यात बँक फसवणुकीचा मोठा पर्दाफाश! 'देमको' बँकेला ५४ लाखांचा गंडा घालणारे पाच आरोपी जेरबंद

ऑनलाइन नोंदणीचे फायदे

हस्तक्षेप होणार बंद

प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही, परिणामी मानवी हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार कमी होईल.

वेळेचे बंधन

संबंधित अधिकाऱ्यांना आता ठरावीक कालावधीतच संस्था नोंदणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल.

पारदर्शकता आणि वेग

सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागत असल्यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि वेळेची मोठी बचत होईल.

डिजिटायझेशन

कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठविली जातील, त्यामुळे ती गहाळ होण्याची भीती राहाणार नाही.

सहकार चळवळीला गती मिळेल. राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी आणि सावकारी परवान्याची सेवा आता घरबसल्या उपलब्ध झाली आहे. नागरिक आपल्या सोयीनुसार घरून किंवा कार्यालयातून कागदपत्रे अपलोड करू शकतात, त्यामुळे कामांना अधिक गती येईल आणि राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

- दीपक तावरे, सहकार आयुक्त, पुणे

सहकार विभागाने सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी, सावकारी परवाना देणे, त्यांच्या नूतनीकरणाची सेवा कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह संबंधित सहकारी संस्थांना आता घर अथवा कार्यालयात बसून आपापल्या सहकारी संस्थेचा अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे ही कामे ऑनलाइन पद्धतीने करता येतील.

- संभाजी निकम, विभागीय सहनिबंधक, नाशिक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news