Ashok Kharat Nashik Case 2026 | भोंदू खरात प्रकरणात राजकीय 'भूकंप'! बड्या महिला नेत्याचा मुलगा एसआयटीच्या रडारवर?

Ashok Kharat Nashik Case 2026 | महिला नेत्याचा 'चॉकलेट हिरो' मुलगा एसआयटीच्या रडारवर
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपास दिवसेंदिवस नवे वळण घेत असून, आता या कथित साम्राज्यामागील आर्थिक आणि सामाजिक भागीदारीचा शोध घेतला जात आहे. शेकडो कोटी रुपयांच्या व्यवहारांत नेमका लाभार्थी कोण, याबाबत चर्चा रंगू लागली अहे. एका महिला नेत्याच्या मुलाचे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ashok Kharat
NDCC बँकेला जीवदान! राज्य सरकारकडून 336 कोटींचा पहिला हप्ता मंजूर; ठेवीदारांना मोठा दिलासा

संबंधित महिला नेत्याचा मुलगा 'चॉकलेट हिरो' म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे नाव खरातशी असलेल्या संबंधांमुळे पुढे येत आहे. अशोक खरात आणि या महिला नेत्यामधील संबंध तपासात उघड होत असून, याबाबत काही कागदोपत्री पुरावेही समोर आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, खरातच्या ईशान्येश्वर मंदिराशी संबंधित 'शिवनिका संस्थान' मध्ये संबंधित महिला विश्वस्त पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांमुळे संबंधित महिला नेत्याला यापूर्वीच दोन महत्त्वाच्या राजकीय पदांवरून पायउतार व्हावे लागले होते.

Ashok Kharat
Ashok Kharat Case | खरात खटला लढण्यास अॅड. अजय मिसर यांचा नकार

आता या प्रकरणात विशेष तपास पथकाने अधिक सखोल चौकशी सुरू केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचाही तपास होत असल्याचे समजते. दरम्यान, संबंधित महिला नेत्या संविधानिक पदावर असताना बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध संगीतकाराविरोधातील तक्रार निकालात काढल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या निर्णयामागे आपल्या मुलाला चित्रपट क्षेत्रात संधी मिळावी हा हेतू होता का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणी आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महिला नेत्याच्या मुलाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या प्रकरणाला आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news