Ashok Kharat Case | खरात खटला लढण्यास अॅड. अजय मिसर यांचा नकार

Ashok Kharat Case | गुरुवारच्या सुनावणीपूर्वीच त्यांनी आपली असमर्थता दर्शवली असल्याने या प्रकरणात नवे वळण आले आहे.
 Consumer Justice-2026 |
Consumer Justice-2026 | न्यायाधीशांची संख्या अपुरी; ग्राहक संरक्षण अडचणीत?File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात महिला लैंगिक शोषण प्रकरणात विशेष तपास पथकाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ सरकारी वकील अजय मिसर यांनी हा खटला लढण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारच्या सुनावणीपूर्वीच त्यांनी आपली असमर्थता दर्शवली असल्याने या प्रकरणात नवे वळण आले आहे.

 Consumer Justice-2026 |
Ashok Kharat Nashik Case | नाशिक हादरले! अशोक खरात प्रकरणात 1 कोटींच्या लाचेचा संशय; बँक अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले

एसआयटीकडून या संवेदनशील प्रकरणात प्रभावी बाजू मांडण्यासाठी अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यासाठी त्यांना लेखी पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती.

मात्र, इतर अत्यंत महत्त्वाच्या आणि वेळखाऊ खटल्यांमुळे या प्रकरणाला पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. मिसर सध्या २०११ च्या २०११ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासह कुख्यात गुन्हेगार रवि पुजारी संदर्भातील महाराष्ट्रातील विविध खटल्यांत व्यस्त आहेत.

 Consumer Justice-2026 |
Simhastha Kumbh Mela 2026| सिंहस्थासाठी 12 नवीन घाट; खर्च, सुविधा वाचा सविस्तर

या खटल्यांची सुनावणी नियमितपणे सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ व लक्ष देणे आवश्यक असल्याने त्यांनी खरात प्रकरण न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अशोक खरातविरोधातील प्रकरण आधीच राज्यभर चर्चेत असून एसआयटीकडून तपास वेगाने सुरू आहे.

अशा परिस्थितीत अनुभवी वकिलाने माघार घेतल्याने पुढील सुनावणीसाठी सक्षम पर्याय शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. आता या प्रकरणासाठी नवीन विशेष सरकारी वकील कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news