Ashok Kharat Case | एक बाबा, बारा भानगडी! भोंदू खरातच्या पडद्यामागचे भयावह विश्व; 'पुढारी'चा विशेष रिपोर्ट

Ashok Kharat Case | भोंदूपणाच्या पडद्यामागे भयावह विश्व दैवीशक्तीचा दिखावा आणि 'जडीबुटी'च्या आड 'बिर्याणी'
Ashok Kharat Nashik Case
Ashok Kharat Nashik CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : निखिल रोकडे

'एक गाव, बारा भानगडी' ही जुनी म्हण भोंदू खरातच्या प्रकरणात अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे. त्याचे एकामागून एक कारनामे उघड होत असून, प्रत्येक घटनेत नवे धक्कादायक पैलू समोर येत आहेत. धार्मिकतेचा आव आणत, दैवी शक्तीचा दावा करत त्याने समाजात विश्वास निर्माण केला; मात्र त्यामागे फसवणूक, दिखावा आणि स्वार्थी हेतू दडलेले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता 'एक बाबा आणि बारा भानगडी' असेच या प्रकरणाचे वर्णन केले जात आहे.

Ashok Kharat Nashik Case
Ashok Kharat Case | विदेशी पूजांच्या नावाखाली खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा

खरातच्या प्रत्येक कृतीतून नवे वाद आणि संशय निर्माण होत असून, त्याच्या भोंदूगिरीचा विस्तार किती मोठा होता, हे हळूहळू उघड होत आहे. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मांसाहार निषिद्ध मानला जात असतानाच, स्वतःला दैवीशक्तीचा धनी म्हणून मिरवणाऱ्या भोंद खरात याची ढोंगी व फसवणूक करणारी वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.

भक्तांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तो स्वतः मात्र मांसाहारी आणि मद्यपानाच्या आहारी गेलेला असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक भक्त त्याला भेटण्यासाठी आला असता खरात समोर बसून जेवण करत होता. त्याच्या ताटात असलेली चिकन बिर्याणी स्पष्टपणे दिसत होती.

भातामध्ये चिकनचे तुकडे पाहून संबंधित भक्ताच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र परिस्थिती हाताळत खरातने आपल्या नेहमीच्या हजरजबाबी शैलीत सफाई देण्याचा प्रयत्न केला. हे मांस नसून एक दुर्मीळ जडीबुटी वनस्पतीची काडी आहे.

ही काडी खाल्ल्याने माझ्यात समोरच्याला ओळखण्याची आणि त्याच्या समस्या जाणून घेण्याची विशेष शक्ती निर्माण होते, असे तो भक्ताला पटवून देत होता. या प्रकारातून खरातची फसवणुकीची पद्धत आणि ढोंगीपणा स्पष्टपणे दिसून येतो.

Ashok Kharat Nashik Case
Nashik Zilla Parishad Corruption | मंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांची परस्पर विक्री

एका बाजूला धार्मिकतेचा आव आणून भक्तांमध्ये स्वतःची 'देवी' प्रतिमा निर्माण करणे आणि दुसऱ्या बाजूला मांसाहारी जेवण व दारूचे सेवन करणे, ही त्याची दुहेरी जीवनशैली उघड झाली आहे. जडीबुटीच्या नावाखाली बिर्याणीतील मांस लपवण्याचा हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेचा गैरवापर असल्याचे बोलले जात आहे.

समाजात अशा भोंदू प्रवृत्तींचा वाढता प्रभाव चिंताजनक ठरत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मधील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरोधात जागरूक राहून योग्य ती भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news