Ashadhi Ekadashi : 12 वर्षे सलग वारीचे मिळाले फळ; नाशिकच्या दाम्पत्याला महापुजेचा मान

नाशिकच्या वारकऱ्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापुजा करण्याचा मान
नाशिक
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न झाली. यावेळी 12 वर्षे सलग वारी करणारे उगले या नाशिकच्या दाम्पत्याला महापुजेचा मान मिळाला.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क । नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले (वय 52) आणि कल्पना कैलास उगले या शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापुजेचा मान मिळाला आहे. उगले हे जातेगाव ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. गेली 12 वर्षे ते विठ्ठलाची सलग वारी करत आहेत. कैलास उगले यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत.

पांडुरंगाच्या मुख्य पुजाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि अन्य उपस्थित होते.

नाशिक
Ashadhi Ekadashi 2025 : बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्ती द्यावी; मुख्यमंत्र्यांचे पांडुरंग चरणी साकडे

नाशिकला सलग दुसऱ्यांदा मिळाला महापुजेचा मान

पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे (वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दापत्याची मागील वर्षी 2024 मध्ये निवड करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला हा मान मिळाला आहे. तर 2023 मध्येही कार्तिकी एकादशीला एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला होता.

नाशिक
Jalgaon Ashadhi Railway : भुसावळवरुन वारकऱ्यांसाठी विशेष आषाढी रेल्वे पंढरपूरकडे रवाना

आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात 15 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news