

As many as 7,759 potholes on city roads
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाट पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्धांमधून शोधताना नाशिककरांची दमछाक होत आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील रस्त्यांवर ७७५९ खड़े व ओघळ पडले असून, त्यापैकी ३८१५ खड्डे व ओघळ बुजविल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. तसेच उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे.
यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सरुवात झाली. मे महिन्यानंतर जून आणि आता जुलैतही अपवाद वगळता पाऊस कायम आहे. पाऊसपाण्यामुळे रस्त्यांच्या कामांचा दर्जा उघडा पडला आहे. रस्ते खड्डेमय झाले असून, या खड्धांमधून मार्गक्रमण करताना नागरिक व वाहनधारकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या खड्यांचा प्रश्न राज्याच्या विधिमंडळात पोहोचला आहे. आमदार राहुल ढिकले, देवयानी फरादे आणि सीमा हिरे यांनी यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
शहरातील रस्त्यांवर गेल्या पाच वर्षांत दीड हजार कोटींचे डांबर ओतले गेल्यानंतरही रस्ते सुस्थितीत नाहीत. तीन वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांकडे असताना देखील महापालिकेकडून या रस्त्यांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. आता बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत शहरात ५० टक्के खड्डे बुजविले गेल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. सर्वेक्षणात शहरात ७७५९ खड्डे व ओघळ असल्याचे समोर आले होते. त्यापैकी ३८१५ खड्डे बुजविण्यात आले असून, अद्यापही ३९५४ खड्डे व ओघळ बुजविणे बाकी आहे.
शहरातील सहाही विभागांच्या तुलनेत सर्वाधिक ३२३८ खड्डे व ओघळ हे सिडको विभागात आहेत. त्याखालोखाल नाशिक रोड विभागात १५५६, पंचवटीत १०४५, सातपूरमध्ये ९९४ तर नाशिक पश्चिममधील रस्त्यांवर २४० खड्डे पडले आहेत. त्यापैकी पश्चिम विभागात १३३, पंचवटी विभागात २२६, सातपूर विभागात ४५९, नाशिक रोड विभागात १२४२, तर सिडको विभागात १३४१ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी केला आहे.