Nashik- मालेगाव बाजार समितीवर भगवा कायम

Malegaon Market Committee election-सभापतिपदी मीनाक्षी देवरे, तर उपसभापती रत्नप्रभा पगार; दोघींनाही १२ मते
Malegaon Market Committee election
मालेगाव बाजार समिती सभागृहात सभापती, उपसभापती निवडीनंतर विजयी चिन्ह दाखवताना नवनिर्वाचित सभापती मनीषा देवरे, उपसभापती रत्नप्रभा पगार व संचालक मंडळ
Published on
Updated on

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) मीनाक्षी देवरे, तर उपसभापतिपदी रत्नप्रभा पगार यांची गुप्त मतदानाद्वारे निवड झाली. दोन्ही पदांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी १२ मते मिळवत त्यांनी विजय मिळविला. विरोधी गटाचे सभापतिपदाचे उमेदवार संदीप पवार तसेच उपसभापतिपदाचे उमेदवार रवींद्र सूर्यवंशी यांना प्रत्येकी ५ मते मिळाली. निकाल जाहीर होताच मंत्री दादा भुसे समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

बाजार समितीच्या सभागृहात दुपारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक जितेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज स्वीकृती, छाननी, माघार आणि मतदानाची प्रक्रिया पार पडली. स्वप्नील मोरे व कमलेश पाटील यांनी सहकार्य केले.

सभापतिपदासाठी मीनाक्षी देवरे व संदीप पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने थेट लढत झाली. उपसभापतिपदासाठी रत्नप्रभा पगार, स्वींद्र सूर्यवंशी, भिका कोतकर आणि चंद्रकांत शेवाळे यांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर चंद्रकांत शेवाळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने तर भिका कोतकर यांचा अर्ज नामंजूर झाल्याने रत्नप्रभा पगार व रवींद्र सूर्यवंशी यांच्यात सरळ सामना रंगला.

एकूण १७ संचालकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीनंतर सभापतिपदासाठी मीनाक्षी देवरे यांना १२, तर संदीप पवार यांना ५ मते मिळाली. उपसभापतिपदासाठी रत्नप्रभा पगार यांना १२, तर रवींद्र सूर्यवंशी यांना ५ मते मिळाली. त्यानुसार दोघींना विजयी घोषित करण्यात आले.

शेतकरी संघ सभापती निकम, उपसभापतिपदी गिल

मालेगाव : येथील शेतकरी सहकारी संघाच्या सभापतिपदी अनिल निकम आणि उपसभापतिपदी सुभाष गिल यांची रविवारी (ता. १२) बिनविरोध निवड झाली. निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

शेतकरी सहकारी संघाची निवडणूक २१ जून रोजी झाली. निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हिरे पॅनेलचा पराभव करून संघावरील सत्ता मिळवली. उपनिबंधक कार्यालयात उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी अनिल निकम, तर उपसभापतिपदासाठी सुभाष गिल यांचेच प्रत्येकी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Malegaon Market Committee election
Coriander prices|कोथिंबीर १२, तर मेथी ९ हजार रुपये शेकडा

निकम यांच्या उमेदवारीस मयूर हिरे यांनी सूचक, तर सचिन साळुंखे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. सुभाष गिल यांच्या उमेदवारीस दिनकर चव्हाण यांनी सूचक, तर रवींद्र शेवाळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक आत्माराम आहिरे, दिनकर चव्हाण, ईश्वर शिसोदे सचिन साळुंखे, आकाश हिरे, मधुकर देवरे, विजय निकम, रवींद्र शेवाळे, मयूर हिरे, मंगला भामरे, पुष्पा शिंदे, काळू ठाकरे, प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेस स्वप्नील मोरे यांनी सहकार्य केले.

नियमामुळे भिका कोतकर यांचा अर्ज नामंजूर

बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी उमेदवार हा ग्रामपंचायत अथवा सेवा सहकारी संस्था (सोसायटी) गटातून निवडून आलेला संचालक असणे बंधनकारक आहे. भिका कोतकर हे व्यापारी गटाचे संचालक असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नियमानुसार छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला

बाजार समितीवर 'महिलाराज'

बाजार समितीवर शिवसेना (शिंदे गट) समर्थकांचे वर्चस्व कायम राहिले. तसेच सभापती व उपसभापती ही दोन्ही महत्त्वाची पदे महिलांकडे गेल्याने बाजार समितीत 'महिलाराज' प्रस्थापित झाले आहे. निकालानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

Malegaon Market Committee election
गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला संजय राऊतांनी शोधून द्यावे

प्रमुख पदे नांदगावला

सभापती मीनाक्षी देवरे या मेहुणे, तर उपसभापती रत्नप्रभा पगार या देवघट येथील रहिवासी आहेत. दोन्ही गावे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात येतात. बाजार समितीच्या सभापती, उपसभापती या दोन्ही पदांवर विराजमान होत या पदांचा मान नांदगाव मतदारसंघाकडे गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news