APK file bank fraud | 'एपीके फाइल' द्वारे दोन बँक खाती रिकामी

१४.५० लाखांचा गंडा : मोबाइलचा ताबा घेत परस्पर काढली रक्कम
Cyber crime news
स्कॅमबहाद्दर एपीके!(File Photo)
Published on: 
Updated on: 

नाशिक : सायबर गुन्हेगारांनी 'एपीके फाइल'चा वापर करून नागरिकांच्या मोबाइलमध्ये प्रवेश मिळविण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. व्हॉट्सअॅपवर पाठविलेली फाइल मोबाइलमध्ये स्थापित करताच त्याद्वारे महत्त्वाची माहिती चोरली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकच्या कामटवाडा परिसरात अशाच प्रकारे दोन जणांच्या बँक खात्यांमधून तब्बल १४ लाख ४९ हजार ९८२ रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

Cyber crime news
Abhijat Marathi Bhasha Saptah |आजपासून 'अभिजात मराठी भाषा सप्ताह'

कामटवाडा परिसरातील अभियंतानगर भागात २ ते ७ जून २०२६ या कालावधीत ही घटना घडली. सायबर पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संशयित प्रदीप नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना हेरून त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एपीके फाइल पाठविली. विविध कारणांचे आमिष दाखवत ही फाइल उघडण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीने संबंधित फाइल मोबाइलमध्ये स्थापित केल्यानंतर त्याच्या मोबाइलचा गैरवापर करून बँक खात्याशी संबंधित माहिती मिळविल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर दोन्ही खात्यांमधून दोन वेगवेगळ्या टप्प्यांत ८ लाख ३६

फाइलच्या रूपात येते 'धोक्याची घंटा'

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना एपीके स्वरूपातील फाइल विविध कारणांनी पाठविली जाते. वीजबिल भरणे, बँकेचे केवायसी अद्ययावत करणे, पार्सलची माहिती घेणे, बक्षीस किंवा सवलत मिळविणे अशा कारणांचा त्यासाठी वापर केला जातो. संबंधित फाइल मोबाइलमध्ये स्थापित केल्यानंतर तिच्या माध्यमातून मोबाइलमधील विविध माहितीपर्यंत पोहोच मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्ती किंवा क्रमांकावरून आलेली कोणतीही फाइल स्थापित करणे धोकादायक ठरू शकते.

Cyber crime news
No UPI Day traders protest -नो यूपीआय डे : दहा कोटींचे व्यवहार ठप्प

हजार रुपये आणि ६ लाख १३ हजार रुपये, अशी एकूण १४ लाख ४९ हजार ९८२ रुपयांची रक्कम काढली. या प्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news