Abhijat Marathi Bhasha Saptah |आजपासून 'अभिजात मराठी भाषा सप्ताह'

दि. ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणार मातृभाषेवर आधारित उपक्रम
Abhijat Marathi Bhasha Saptah
राज्यात ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' pudhari photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि वैभव जपण्यासाठी तसेच जनमानसात मराठी भाषेबद्दल अभिमान आणि जनजागृतीच्या उद्देशाने दरवर्षी ३ ऑक्टोबरला 'अभिजात मराठी भाषा दिन' साजरा करण्यात येत आहे. तसेच ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताहनिमित्त यंदाही दि. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शासकीय कार्यालयासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषेचा गौरव होणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्था, साहित्यिक आणि भाषा अभ्यासकांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या सुमारे २५०० वर्षांच्या समृद्ध भाषिक व सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून मराठी भाषेचा इतिहास, प्राचीन साहित्य, संत साहित्य, लोकपरंपरा आणि आधुनिक मराठी साहित्य याबाबत अभिजात मराठी भाषा सप्ताहात जनजागृती केली जाणार आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा आमच्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे मराठी संवर्धनाची जबाबदारी आम्ही जाणीवपूर्वक पार पाडत आहोत. बोलीभाषांचे जतन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांतून भाषेची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

भास्कर ढोके, शिक्षण अधिकारी, मविप्र.

निबंध व वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिकांच्या भेटी तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणार आहे. डिजिटल माध्यमांतूनही मराठी भाषेच्या समृद्ध वारशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे. मराठी भाषेचा वापर वाढविणे आणि तिच्या संवर्धनासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

Abhijat Marathi Bhasha Saptah
Devi Idol Price Rise | यंदा नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती महागल्या! कच्चा माल अन् मजुरी वाढल्याने 25 ते 30 टक्क्यांनी दरांत वाढ

संवाद समृद्ध करण्यावर भर

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शिक्षकांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे. व्याकरण, शब्दसंग्रह, भाषिक संस्कार व मातृभाषेवरील प्रेम वृद्धिंगत करण्यासह आगंतुकांशी उत्तम मराठीत संवाद साधण्यावर भर देण्याचे उपक्रम काही शाळा, महाविद्यालयांत अभिजात मराठी भाषा सप्ताहादरम्यान घेतले जाणार आहेत.

Abhijat Marathi Bhasha Saptah
Nashik infant baby dead body bike transport : दुचाकीवरून ६० किमी नेला बाळाचा मृतदेह! निर्दयी यंत्रणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news