Digital Arrest : अन् ज्येष्ठ दाम्पत्याची 'डिजिटल अरेस्ट' टळली

सायबर पोलिसांची तत्परता; १२ तासांच्या जाळ्यातून पोलिसांनी सुटका केली
threat of 'digital house arrest'
Digital Arrest : अन् ज्येष्ठ दाम्पत्याची 'डिजिटल अरेस्ट' टळलीPudhari File Photo
Published on
Updated on

And the elderly couple's 'digital arrest' was averted

नशिक : निखिल रोकडे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या सतर्क यंत्रणेमुळे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची 'डिजिटल अरेस्ट'च्या खोट्या नाटकातून होणारी १० लाख रुपयांची फसवणूक थोडक्यात टळली. पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे हे दाम्पत्य गुन्हेगारांच्या जाळ्यातून सुरक्षित बाहेर आले.

threat of 'digital house arrest'
Bhalekar school : भालेकर शाळा पुन्हा सुरु होणार !

फोनवरील एक आवाज घरी येणाऱ्या कायद्यापेक्षा भयंकर वाटू शकतो. पण, याच युगात सतर्कतेची ढाल बनून उभे राहणाऱ्या पोलिस यंत्रणेवरील नागरिकांचा या घटनेमुळे विश्वास पुन्हा दृढ झाला.

नाशिक शहरात वाढत्या डिजिटल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायाने वकील असलेल्या दाम्पत्याला गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल १२ तासांच्या मानसिक छळातून १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिस आयुक्तालयाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे ही फसवणूक रोखण्यात यश आले.

threat of 'digital house arrest'
Sanjay Shirsat : शक्य तेथे युती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत

सकाळी ७.३०च्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांना एक फोन आला. समोरचा व्यक्ती अत्यंत शुद्ध हिंदी, इंग्रजी बोलत, स्वतःला कायदा अंमलबजावणी संस्थेशी जोडून घेत असल्याचा आव आणत होता. 'तुमच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडले असून, ५४० कोटींचा व्यवहार झाला आहे. ही रक्कम दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आली असून तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. तुम्ही आता 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आहात,' अशी भीतीदायक माहिती देण्यात आली.

प्रवेशद्वारापाशी उभे असल्यागत वागणे, मोबाईलच्या स्क्रीनसमोरून हलू नये, कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगणे, पती - पत्नींपैकी एकाने कायम स्क्रीनसमोर राहणे अशा सुचनांनी दांपत्य पूर्णपणे गुन्हेगारांच्या तावडीत अडकल्याची भावना निर्माण झाली. त्यांना ईडी, सीबीआय, न्यायालय व पोलिस अशा वेगवेगळ्या कार्यालयांतून व्हिडिओकॉल आल्याचे भासवून 'अरेस्ट' दाखविण्यात आले. अगदी 'जामीन मंजूर' झाल्याची बनावट कॉपीदेखील पाठविण्यात आली.

सायंकाळपर्यंत गुन्हेगारांनी पुढील टप्पा राबवला

'तुमच्या सर्व खात्यांतील पैसे आमच्या 'सिक्रेट सव्र्व्हेलन्स अकाउंट'वर पाठवा; नाहीतर उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाईल,' अशी धमकी देत १० लाख रुपये जमा करण्याची सक्ती करण्यात आली. घाबरलेल्या दाम्पत्याने आपल्या मुलीशी संपर्क साधून पैसे मागितले. बोलण्यात भीती जाणवल्याने तिच्या नवऱ्याने तत्काळ पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधला. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तातडीने त्या कुटुंबाच्या घरी पोहोचले. परिस्थितीची सखोल पडताळणी करून त्यांनी दाम्पत्याला हे संपूर्ण प्रकरण ही एक योजनाबद्ध डिजिटल फसवणूक असल्याचे समजावून दिले. दाम्पत्याने लगेचच गुन्हेगारांशी संपर्क तोडला. सायबर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे १० लाखांची फसवणूक टळली असून, ज्येष्ठ दाम्पत्याने पोलिस यंत्रणेचे मनःपूर्वक आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news