Ajit Pawar Birth Anniversary | "दिंडोरीत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात अजितदादा पवारांना अभिवादन; कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती"

Ajit Pawar Birth Anniversary | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती बुधवारी (दि. २२) अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती बुधवारी (दि. २२) अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ झिरवाळ यांनी अजितदादांच्या कार्य आणि विचारांचा गौरव केला.

Ajit Pawar
ZP Scholarship Exam | "गतवर्षी केवळ 23 % निकाल! चौथी अन् सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय"

अजितदादा पवार हे शिस्तबद्ध व प्रशासनावरील मजबूत पकड आणि तत्पर निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि केलेले कार्य घराघरांत पोहोचवणे हीच सर्वांची खरी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे,

Ajit Pawar
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेस 26 कोटी प्रोत्साहन अनुदान; म्युनिसिपल बाँडच्या यशाला केंद्राची दाद

माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक टोंगारे, माजी सरपंच प्रीतम देशमुख, माजी उपनगराध्यक्षा शैला उफाडे,

हिरामण गावित, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते, युवक शहराध्यक्ष प्रतीक जाधव, विकी घोलप, विक्रम मवाळ, सत्यजित राजे, रघुनाथ पाटील, नरेंद्र पेलमहाले, नगरसेवक दीपक जाधव, सलीम मिर्झा, जहिर शेख, प्रसाद जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news