AITUC Nashik District Convention | कामगार, कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार

AITUC Nashik District Convention | बबली रावत : आयटक जिल्हा अधिवेशनात 14 महत्त्वाचे ठराव मंजूर ; कार्यकारिणी निवड
AITUC Nashik District Convention
AITUC Nashik District Convention
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कामगारांच्या हक्कांवर होत असलेले हल्ले, खासगीकरण, कंत्राटीकरण आणि असंघटित व योजना कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) नाशिक जिल्हा अधिवेशनात करण्यात आला.

AITUC Nashik District Convention
Nashik-Pune railway highway |नाशिक-पुणे रेल्वे महामार्ग वादात भुजबळांची उडी

द्वारका परिसरातील जानकी प्लाझामधील दत्ता देशमुख सभागृहामध्ये पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आयटकच्या राष्ट्रीय सचिव बबली रावत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी व्ही. डी. धनवट होते. यावेळी राज्य सचिव राजू देसले, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, दत्ता निकम, मीना आढाव, सुनिता कुलकर्णी, हसिना शेख, भीमा पाटील, ओंकार जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला. चार श्रमसंहिता रद्द करणे, खासगीकरण थांबवणे आणि सर्वांना सामाजिक सुरक्षा व पेन्शन देणे या प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या. घरकामगार, महिला कामगार, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी व कंत्राटी कामगारांना संघटित करून व्यापक संघर्ष उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

राजू देसले यांनी संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचे प्रस्ताव मांडले, नाशिक जिल्ह्यात आयटक संलग्न संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. येत्या काळात राज्य व केंद्र सरकारच्या कामगार, कर्मचारी धोरणाविरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. भीमा पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्राजक्ता कापडणे यांनी सूत्रसंचालन केले.

अधिवेशनातील प्रमुख ठराव

  • चार श्रमसंहिता रद्द करून राज्यात त्यांची अंमलबजावणी न करणे.

  • बँक, एलआयसी, वीज यांसारख्या क्षेत्रांतील खासगीकरण थांबवणे.

  • पेन्शनधारकांना महागाई भत्त्यासह दरमहा ९ हजार रुपये पेन्शन देणे.

  • कंत्राटी कामगार व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन, ईएसआय, पीएफ, ग्रॅच्युइटी व बोनस लागू करणे.

  • आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे.

  • अंशकालीन स्त्री परिचारिकांना कर्मचारी दर्जा देणे व गटप्रवर्तकांचे समायोजन करणे.

  • घरकामगार, बांधकाम कामगार, ग्रामरोजगार सेवक, अल्पबचत प्रतिनिधी आणि सुरक्षारक्षकांना सामाजिक सुरक्षा व इतर प्रलंबित हक्क प्रदान करणे.

AITUC Nashik District Convention
Nashik Ganesh Mandal | नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय! सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप शुल्क पूर्णपणे माफ

नूतन जिल्हा कार्यकारिणी

  • जिल्हाध्यक्ष : व्ही. डी. धनवटे

  • जिल्हा कार्याध्यक्ष : ॲड. दत्ता निकम व सखाराम दुर्गुडे

  • जिल्हा सचिव : पंडितराव कुमावत

  • सहसचिव : भीमा पाटील व ओंकार जाधव

  • जिल्हा प्रसिद्धी प्रमुख : बाबासाहेब कदम

  • नाशिक जिल्हा काउन्सिल सदस्य : राजेंद्र जगताप, सुनिता गांगुर्डे, रत्ना म्हस्के, समिरा शेख, मीना आढाव, मीनाक्षी मोरे, उज्ज्वल गांगुर्डे, चित्रा जगताप, वैशाली देशपुते, लता तुपे, राधा जाधव, शरद जगताप, लता जाधव, रंजना आहेर

  • सल्लागार : नूतन सोनवणे, तातेराव जाधव, राजू नाईक, अशोक मोरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news