Air Travel price increased| हवाई यात्रेचा भडका; प्रवास ३५ टक्क्यांनी महागला

ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या उद्योजक, पर्यटकांचे बजेट कोलमडले
Air Travel price increased
Air Travel price increasedfile photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशभरातील हवाई प्रवासी सेवांमध्ये तब्बल ३५.५२ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या दरवाढीचा थेट फटका नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि इंदूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या विमान तिकिटांचे दर एकदम वाढले आहेत. ऐन पर्यटन हंगामात तिकिटांचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे नाशिककरांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने 'सर्व्हिस

प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स' (एसपीपीआय) अंतर्गत जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, हवाई प्रवासी सेवांमधील महागाई वार्षिक आधारावर ३१.९४ टक्क्यांवरून ३५.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत १२६.४ असलेला हवाईसेवा मूल्य निर्देशांक दुसऱ्या तिमाहीत १२७.८ वर गेला आहे. इंधन दरवाढ, विमान कंपन्यांचा वाढलेला देखभाल खर्च आणि प्रवाशांची वाढती मागणी यामुळे तिकिटांच्या दरात ही मोठी वाढ झाली आहे. एकंदरीत, नाशिकच्या विमानसेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच, तिकिटांच्या दरात झालेल्या या ३५ टक्क्यांहून अधिक वाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे नाशिकहून अधिक विमान कंपन्यांच्या सेवा सुरू करून स्पर्धा वाढवावी आणि तिकीट दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

नाशिकच्या प्रवाशांवर झालेला परिणाम; नियोजन बदलावे लागणार

नाशिकहून दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद येथे जाणाऱ्या विमानांचे सामान्य दिवसांत ३,५०० ते ५,००० रुपयांपर्यंत मिळणारे तिकीट आता ७,००० ते १२,००० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. आयत्या वेळी प्रवास करणाऱ्यांना तर याहून अधिक दर मोजावे लागत आहेत.

नाशिक हे औद्योगिक शहर असल्यामुळे सातपूर, अंबड आणि सिन्नर एमआयडीसीतील उद्योजक तसेच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा नियमित हवाई प्रवास असतो. वाढलेल्या तिकीट दरामुळे कंपन्यांच्या प्रवास खर्चात मोठी वाढ झाली आहे.

Air Travel price increased
6 Nashik Teachers State Award | नाशिकच्या ६ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. तसेच, नाशिकमधून बाहेरगावी पर्यटनासाठी जाणाऱ्या कुटुंबांना वाढलेल्या दरांमुळे आपले नियोजन बदलावे लागत आहे.

Air Travel price increased
Nashik Traffic Challan 20 Percent Discount |अद्याप वसूल न झालेल्या वाहतूक ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत मिळणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.