Simhastha Kumbh Mela 2026| सिंहस्थासाठी 12 नवीन घाट; खर्च, सुविधा वाचा सविस्तर

Simhastha Kumbh Mela | नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधींसह स्नानक्षमता वाढणार
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027 New Ghat

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर १२ नवीन घाट उभारण्यात येत असून, भाविकांसाठी उपलब्ध होणारी स्नान व धार्मिक विधींची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Water Cut: नाशिकमध्ये पाणीपुरवठ्याचा दोन दिवसांचा 'शटडाउन'; तारखा, वेळ काय?

नाशिक महापालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. शहरातील घाटांची संख्या १० वरून २० पर्यंत वाढविण्यात येणार असून, सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या गोदावरी किनाऱ्यावर ही विस्तारयोजना राबविली जात आहे.

एकूण ३,४५१ मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार असून, यासाठी अंदाजे ३६१.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या डाव्या व उजव्या काठावर प्रत्येकी एक असे दोन नवीन घाट उभारले जात असून, एकूण ३,१४० मीटर लांबीची वाढ होणार आहे. जलसंपदा विभागामार्फत सुमारे १४६.१० कोटी रुपये खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली असून, मार्च २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Unseasonal Rain 2026 | बागलाणात अवकाळीने 14,809 हेक्टर पिकांचे नुकसान

... असे असेल नियोजन

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घाटांची रचना करताना गर्दी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घाटासाठी निश्चित क्षमता, पोलिस चौक्या, वॉचटॉवर्स, स्वतंत्र प्रवेश निर्गम मार्ग, आपत्कालीन सेवा मार्ग आणि पार्किंगशी जोडणी यांचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय वस्त्रांतरगृहे, स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था ही मूलभूत सुविधा म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जात असून, सिंहस्थादरम्यान विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.

घाट हेच सिंहस्थाचे केंद्रबिंदू आहेत. रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा यांसारख्या इतर सर्व पायाभूत व्यवस्था भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थाला साजेशी व्यवस्था उभारण्यात येत आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news