FDA Maharashtra | मिठाईच्या गोडव्याआड भेसळीचा कडवटपणा

FDA Maharashtra action mode - णासुदीत खवा, मावा, पनीर, तूप एफडीएच्या रडारवर
मिठाई
sweets
Published on
Updated on

नाशिक : सणासुदीचा काळ म्हणजे मिठाईच्या मागणीत मोठी वाढ आणि याच संधीचा गैरफायदा घेत भेसळखोरांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात मिठाई विक्रेते, उत्पादक तसेच खवा-मावा, पनीर, तूप आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मागील कारवायांत मोठ्या प्रमाणावर मिठाई विक्रेत्यांकडून संशयास्पद खाद्यपदार्थ जप्त झाल्याने यंदाच्या मोहिमेकडे विशेष लक्ष लागले आहे.

मिठाई
50-plus Nashik tourists stranded in Nepal floods| नाशिकचे ५० हून अधिक पर्यटक नेपाळच्या जलप्रलयात अडकले

सणांच्या काळात मिठाईची मागणी अचानक वाढते. त्यामुळे खवा, मावा, दूध, तूप आणि पनीर या कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. याच काळात कमी दर्जाचा किंवा संशयास्पद कच्चा माल वापरण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने उत्पादक आणि विक्रेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. २०२५ मध्येही नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेते आणि नागरिकांना दक्षतेचे आवाहन करत अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवली होती.

२०२६ मध्येही कारवाईचा धडाका

ऑगस्टमध्ये जिल्ह्यात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. देवळाली, दिंडोरी आणि सटाणा परिसरातील कारवाईत तीन लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पंचवटीतील एका आस्थापनातून सोनपापडी, गुलाबजामून आणि मिल्क बर्फी असा १ हजार २३६ किलो वजनाचा आणि १ लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आस्थापनाचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला. या कारवाईत शहरातील आणखी चार खाद्य आस्थापनांचे परवानेही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित त्रुटींमुळे निलंबित करण्यात आले.

मिठाई
मायेपासून वंचित ७५ बालकांना परदेशात मिळाले आई-वडिलांचे छत्र

एफडीएचे आवाहन

सणाच्या आनंदात आरोग्याशी तडजोड होऊ परवानाधारक आणि नये, यासाठी ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करावी. किंवा दर्जा जाणवल्यास संशयास्पद रंग, वास, चव संबंधित खाद्यपदार्थ खरेदी न करता प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बेस्ट बिफोरकडे लक्ष देण्याचे आवाहन

मिठाईची गुणवत्ता तपासतानाच विक्रेत्यांनी मिठाईच्या ट्रेवर किंवा दर्शनी ठिकाणी तिची बेस्ट बिफोरची माहिती स्पष्टपणे नमूद करणे अपेक्षित आहे. यापूर्वी शहरातील काही दुकानांत ही माहिती नमूद केली जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना उत्पादनाचा ताजेपणा, कच्च्या मालाचा दर्जा आणि बेस्ट बिफोरची माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले होते.

मिठाई विक्रेत्यांवर डोळा

खवा - मावा आणि पनीरच्या गुणवत्तेची तपासणी

दूध, तूप व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने

तयार मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी

संशयास्पद साठा आढळल्यास थेट जप्ती

परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई

अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई

नियमभंग करणाऱ्यांचे परवाने निलंबितची शक्यता

नाशिकमध्ये भेसळीविरोधात कारवाईचा धडाका

२०२५ मध्ये अंबडला ४७ हजार ८०० रुपयांचे २३९ किलो पनीर जप्त

२०२६ मध्ये पंचवटीत १ लाख ९१ हजारांची १२३६ किलो मिठाई जप्त

ऑगस्ट २०२६ मधील कारवायांत ३ लाख १० हजारांचा दंड वसूल

अलीकडील कारवाईत ५ आस्थापनांचे परवाने निलंबित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news