

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
म्हसरुळ परिसरातील धात्रक टोळीतील गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार, टोळीतील चौघांविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे.
गणेश बाबुराव धात्रक, दर्शन गोरख गायकवाड (रा. मातोरी), अभिषेक अनिल गिरी (रा. म्हसरुळ), आकाश पांडुरंग चारोस्कर (रा. मातोरी) यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या चौघांनी मिळून ऑगस्ट महिन्यात गौरव थोरात (२१, रा. पेठरोड) याच्यावर कुरापत काढून प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस तपासात या टोळीने शहरातील म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली व नाशिक तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शस्त्र दाखवून मारहाण करणे, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, दंगा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील गुन्हेगारांविरोधात १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करीत या टोळीतील चौघांविरोधात मोक्कानुसार कारवाई केली आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी चालू वर्षात पाच टोळ्यांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. तसेच ९ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा :