Abhijit Dipke Schools Inspection | नाशिक मनपा शाळांची पोलखोल होणार! अभिजित दीपके करणार प्रत्यक्ष पाहणी, शिक्षण विभागाला दिला अर्ज

Abhijit Dipke Schools Inspection | शिक्षण विभागाकडे अर्ज : त्रुटींचा अहवाल सार्वजनिक करण्याचा इशारा
Schools
SchoolsPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे लेखी अर्ज सादर केला आहे. शिक्षण विभागाकडून या पाहणीसाठी कोणत्या स्वरूपात सहकार्य केले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Schools
Sumit Pagare Crime Case | राजू शेखसह 3 संशयित आरोपींना कल्याणहून नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महापालिकेच्या शाळांमधील वर्ग खोल्यांची स्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची उपलब्धता व स्थिती, फर्निचर, संगणक आणि डिजिटल सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शिक्षकांची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात येणार असल्याचे दीपके यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

राज्यातील शाळांमधील पायाभूत सुविधांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दीपके यांनी राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्यांनी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांची पाहणी केली असून, आता नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शाळांचीही पाहणी करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेच्या शाळांनाही भेटी देऊन तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

नाशिक महानगरपालिकेमार्फत सुमारे १०० शाळा चालविल्या जात असून, त्यामध्ये जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांमधील उपलब्ध सुविधा आणि प्रत्यक्ष परिस्थिती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न दीपके यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी आणि उणिवांचा सविस्तर अहवाल तयार करून तो सार्वजनिक करण्याचे दीपके यांनी म्हटले आहे. तसेच आवश्यक वाटल्यास संबंधित प्रश्नांवर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Schools
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 8 आणि 9 ऑक्टोबरला रंगणार सभापतीपदाचा संग्राम

शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष:
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे पाहणीसाठी अर्ज सादर करण्यात आल्यानंतर विभागाकडून त्यास कसा प्रतिसाद दिला जातो आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी कितपत सहकार्य केले जाते, याकडे लक्ष लागले आहे. दीपके यांच्या या मोहिमेमुळे नाशिक महापालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शिक्षणव्यवस्थेची प्रत्यक्ष स्थिती चर्चेत येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news