नाशिक : चणकापूर धरणात उडी घेवून शिक्षकाने संपवले जीवन

जीवन संपवल्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
Nashik Sucide News
मृत विलास कापडणीसPudhari Photo
Published on
Updated on

कनाशी पुढारी वृत्तसेवा

कनाशी तालुक्यातील चणकापूर धरणात सटाणा येथील शिक्षकांने उडी घेत जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि.15) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलास केशवराव कापडणीस (रा हौसिंग सोसायटी, नामपूर रोड, ता सटाणा जि नाशिक ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

Nashik Sucide News
फोटो व्हायरल करण्याची धमकी; विद्यार्थिनीने जीवन संपवले

याबाबत अधिक माहिती अशी कि, चणकापूर धरणाच्या आउटलेट क्रमांक १३५ च्या गेट जवळ रविवारी (दि.15) एका इसमाने उडी घेतल्याची माहिती समोर आली होती. धरणानजीक (एमएच ४१ एपी ४३१६) क्रमांकाची दुचाकी, चपला, मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी धरणात उडी मारून जीवन संपवल्याच्या शंका बळावल्या. यानंतर अभोणा पोलीसांनी शोध सुरु केले. परंतु त्यांना यश आले नाही म्हणून त्यांनी मदतीसाठी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केले होते.

Nashik Sucide News
पिंपरी : मोबाईलचा हट्ट न पुरविल्याने विवाहितेने संपवले जीवन

त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरु ठेवल्यानंतर सोमवारी (दि.१६) सकाळी विलास केशवराव कापडणीस (वय ३८ ) शिक्षक यांचा मुतदेह मिळून आला आहे. म्हणून चणकापूरचे पोलीस पाटील नंदू देवराम जगताप यांचे खबर नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकी यशवंत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौधरी, एस डी बोरसे तपास करीत आहेत. दरम्यान विलास केशवराव कापडणीस यांनी त्यांचे भ्रमणध्वनी वरून त्यांची पत्नी दिपाली विलास कापडणीस यांना मी चणकापूर धरणावर आलो आहे. व हा माझा शेवटचा कॉल आहे असे सांगून कॉल कट केला असे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news