पिंपरी : मोबाईलचा हट्ट न पुरविल्याने विवाहितेने संपवले जीवन

काळेवाडी येथील घटना
Sucide Case In Pimpari
मृत शिवानी शर्माPudhari Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

काळेवाडी येथे पतीने मोबाइल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने नाराज झालेल्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपल्याची घटना समोर आली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.११) काळेवाडीतील पवनानगर येथे घडली. शिवानी गोपाल शर्मा (वय.२०, मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. लेन नंबर ४, पवनानगर, काळेवाडी ) असे मृत महिलेचे नाव आहे.

जळगाव : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी आणि त्यांचे पती गोपाल शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान, काळेवाडीतील पवनानगर येथे ते वास्तव्यास होते. गोपाल हे एका कंपनीत सीएनसी मशिन ऑपरेटर म्हणून काम करतात. मागील चार ते पाच दिवसांपासून गोपाल शर्मा यांची पत्नी शिवानी ही त्यांच्याकडे नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट करत होती. तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल, असे तिचे म्हणणे होते. मात्र, गोपाळ यांच्याकडे पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाइल घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पत्नी शिवानी त्यांच्यावर नाराज झाली होती.

दरम्यान, गोपाल वापरत असलेला मोबाइल काही तांत्रिक कारणाने बिघडला. त्यांच्या कंपनीचे फोन येत असल्याने त्यांना नवीन मोबाइल घ्यावा लगला. त्यानंतर त्यांनी जुना मोबाइल दुरुस्तीला देऊन तो मोबाइल आपल्या पत्नीला देण्याचे त्यांनी ठरविले होते. मात्र, याबाबत त्यांनी पत्नीला काही कळविले नाही. पत्नी शिवानी हीने गोपाल यांनी स्वत:ला नवीन मोबाइल घेतल्याचे पाहिले. त्यावर तीने चिडून गोपाल यांच्याशी भांडण केले. बुधवारी (दि.11) सकाळी गोपाल हे नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी सात वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा अर्धवट लावलेला दिसला. दरवाजा उघडून ते आत गेले असता पत्नीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

हरोलीतील विवाहितेची जयसिंगपुरात आत्महत्या
बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षकडून एका महिलेने जीवन संपवल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जीवन संपवलेल्या महिलेच्या पतीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. नवीन मोबाइल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने जीवन संपवल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. -
निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, वाकड पोलिस ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news