Nashik Ganesh Immersion | गणेश विसर्जनासाठी 77 स्थळांची निश्चिती

Nashik Ganesh Immersion | 40 कृत्रिम, 19 नैसर्गिक, तर 18 ठिकाणी नैसर्गिकसह कृत्रिम तलावांची सुविधा
Ganesh Idol Immersion
Ganesh Idol ImmersionPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ठिकठिकाणी गोदाघाटांवर सुरू असलेल्या कामांमुळे गणेश विसर्जनदिनी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने आतापासूनच विसर्जनच्या नैसर्गिक, कृत्रिम स्थळांचा समावेश असलेली ७७ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १९ नैसर्गिक, तर ४० ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असणार आहे.

Ganesh Idol Immersion
Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

तसेच १९ नैसर्गिक ठिकाणी कृत्रिम तलावांचीही दुहेरी सुविधा भाविकांसाठी महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके, आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत विसर्जन स्थळांची यादी जाहीर करण्याची मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त गोदाघाटांवर ठिकठिकाणी कामे सुरू असल्यामुळे विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ती होऊ नये, यासाठी महापालिकेने विसर्जन स्थळांची यादी आधीच जाहीर करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. महापौर, आयुक्तांच्या सूचनेनुसार शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी गोदाघाटाची पाहणी करून विसर्जन स्थळांची यादी जाहीर केली आहे.

Ganesh Idol Immersion
Hindu Succession Act | हिंदू वारसा कायद्यात मुलींना समान हक्क; नाशिक बार असोसिएशनच्या विधी व्याख्यानमालेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

विसर्जनाची नैसर्गिक ठिकाणे:

  • नाशिक पूर्व : लक्ष्मी नारायण घाट, कन्नमवार पूल घाट, रामदास स्वामी घाट, नंदिनी गोदावरी संगम.

  • नाशिक पश्चिम : यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घरपुरे घाट, हनुमान घाट अशोकस्तंभ.

  • पंचवटी : रामकुंड परिसर, म्हसरूळ सीता-सरोवर, नांदूर मानूर गोदावरी पूल, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल, आडगाव पाझर तलाव, तपोवन कपिला संगम, गाडगेमहाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल.

  • नाशिकरोड : दसक घाट गोदावरी नदी, चेहेडी गाव दारणा नदी, देवळाली गाव वालदेवी नदी, विहितगाव वालदेवी नदी, वडनेरगाव वालदेवी नदी.

  • सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, असाराम बापू पूल, आयटीआय पुलाजवळ.

Ganesh Idol Immersion
Nashik Municipal Corporation | गणेशोत्सवापूर्वी नाशिक खड्डेमुक्त होणार? मनपाचा 18,423 खड्डे बुजवल्याचा दावा

विसर्जनासाठी कृत्रिम तलाव:

  • नाशिक पूर्व : लक्ष्मी नारायण घाट, कन्नमवार पूल, रामदास स्वामी मठाजवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शरदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक राजसारथी सोसायटी.

  • नाशिक पश्चिम : चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी परिचा बाग, फॉरेस्ट नर्सरी पूल, येवलेकर मळा बॅडमिंटन हॉल, दोंदे पूल म्हसोबा मंदिराजवळ.

  • पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय वाघाडी नदी, कोणार्कनगर, म्हसरूळ सीता-सरोवर, तपोवन कपिला संगम, प्रमोद महाजन उद्यानाजवळ रासबिहारी शाळेसमोर, रामवाडी चिंचबन, कमलनगर, रोकडोबा सांडवा ते गौरी पटांगण परिसर.

  • नाशिकरोड : नारायण बापू चौक, राजराजेश्वरी चौक, चेहेडी ट्रक टर्मिनस, निसर्गोपचार केंद्र जय भवानी रोड, शिकरेवाडी मैदान, गाडेकर मळा आर्टिलरी सेंटर रोड, मनपा शाळा क्रमांक १२५.

  • सिडको : पवननगर जलकुंभ, गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुने सिडको, राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ कर्मयोगीनगर, राजे संभाजी स्टेडियम अश्विननगर, अंबड पोलिस स्टेशन, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा, पवननगर जलकुंभ हिरे शाळेजवळ, डे-केअर शाळा रामनगर, गामणे मैदान, वासननगर, अंजना लॉन्स पाथर्डी, पिंपळगाव खांब, वालदेवी घाट.

  • सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसारामबापू पूल, पाइपलाइन रोड, सूर्याल्फी चौक शिवाजीनगर, अशोकनगर पोलिस चौकीसमोर, अंबड-लिक रोड नंदिनी पुलाजवळ, आयटीआय पुलाजवळ, पपया नर्सरीजवळ, पिंपळगाव बहुला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news