नाशिक: देवळा, उमराणे बाजार समितीत कडकडीत बंद: २ कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक: देवळा, उमराणे बाजार समितीत कडकडीत बंद: २ कोटींची उलाढाल ठप्प

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या बाजार समिती २०१८ सुधारणा विधेयकाविरोधात आज (दि. २६) देवळा व उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे समितीच्या आवारात शुकशुकाट दिसून आला. तर जवळपास २ ते अडीच कोटींची उलाढाल ठप्प झाली. तर दुसरीकडे देवळा येथील सुनील आहेर व रामेश्वर कृषी मार्केट खारीपाडा या खासगी बाजार समित्या चालू होत्या.

राज्य सरकारने कृषी उत्पन्न पणन अधिनियम या विधेयकात काही सुधारणा केल्याने बाजार समित्यांसह समितीतील घटकांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. बाजार समित्यांवर प्रशासक बसविण्याची तयारी सुरू असल्याचे आरोप शेतकरी संघटनांनी केले आहेत.
दरम्यान, देवळा बाजार समितीत लाल कांद्याची होणारी आवक साधारण ७५०० क्विंटल तर उमराणे बाजार समिती ८००० आठ हजार क्विंटल आवक व सरासरी १५०० रु बाजार भावाच्या खरेदीच्या हिशोबाने आजचा बंदमुळे दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

तर देवळा येथे सकाळच्या सत्रात सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये ६००० क्विंटल लाल कांद्याची आवक होती . कमीत कमी ६०० ,जास्तीत जास्त २१०० ,सरासरी १७५० असा बाजारभाव होता. व रामेश्वर कृषी मार्केट खारीपाडा येथे ६००० क्विंटल आवक होती. भाव कमीत कमी ४३०, जास्तीत जास्त २०००, सरासरी १७०० असा लाल कांद्याला बाजार भाव मिळाला.

केंद्र सरकारने बाजार समितींच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळावर गदा आणून, कायमस्वरूपी प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. व्यापारी, दलाल, व सत्तेवर आलेल्या राजकीय बगलबच्यांशी सोय व्हावी, या उद्देशाने नविन कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. ती सर्वस्वी गैर असून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे, आम्ही त्याचा निषेध करतो, नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत्यांचे कामकाज बंद करून समर्थन दिले .

-कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news