Gangapur Road Traffic | गंगापूर रोडच्या वाहतूक कोंडीला मिळणार पर्यायी मार्ग

Gangapur Road Traffic | महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज रस्त्यासाठी 65.91 कोटी मंजूर
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावाला अखेर मोठे बळ मिळाले आहे. महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज उजवा तट कालवा रस्ता विकसित करण्यासह या मार्गावरील वीजवाहिन्यांचे स्थानांतर करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने तब्बल ६५ कोटी ९१ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे गंगापूर रोडला समांतर पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Traffic Police
Nashik Ganesh Mandal | नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय! सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप शुल्क पूर्णपणे माफ

या प्रकल्पासाठी कालवा रस्ता विकासासाठी ५६ कोटी ९१ लाख, तर वीजवाहिन्या हस्तान्ंतरासाठी ९ कोटी, अशी एकूण ६५.९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही कामे मार्च २०२७ अखेरपर्यंत किंवा आवश्यकतेनुसार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग तातडीने विकसित करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

गंगापूर रोडवरील वाढती वाहतूक आणि आनंदवली, पाइपलाइन रोड परिसरातील झपाट्याने वाढलेल्या नागरी वसाहतींमुळे या भागातील अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने गंभीर होत आहे.

बारदान फाटा ते अशोकस्तंभ या गंगापूर रोडवरील रुंदीकरणाचा भूसंपादनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने पर्यायी मार्ग म्हणून कालवा रस्त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. यापूर्वी महापालिकेने भोसला महाविद्यालय ते कबीरनगर झोपडपट्टीमार्गे बारदान फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सिंहस्थ प्राधिकरणाकडे पाठविला होता.

सध्या सुमारे ९ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे १५ मीटरपर्यंत रुंदीकरण, तर कबीरनगर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात १२ मीटर रुंदीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज हा उजवा तट कालवा रस्ता विकसित झाल्यास गंगापूरकडून महात्मा नगर, कॉलेज रोड तसेच शहराच्या अन्य भागांकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुख्य गंगापूर रोडवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

Traffic Police
NDCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांची पुन्हा फेरचौकशी; सहकार विभागाचे मोठे आदेश

चार वर्षांच्या पाठपुराव्याला यश

या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले. सिंहस्थापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"गंगापूर रोडवरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता समांतर असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. शासनाने दखल घेऊन निधी मंजूर केला आहे. आता काम तातडीने पूर्ण होऊन सिंहस्थापूर्वी हा रस्ता वापरात येईल."

- विलास शिंदे, उपमहापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news