Nashik News : गोदा प्रदूषणमुक्तीसाठी 1,140 कोटींच्या मलवाहिका

अलमण्डस कंपनीमार्फत सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
Godavari river pollution control project
गोदा प्रदूषणमुक्तीसाठी 1,140 कोटींच्या मलवाहिकाpudhari photo
Published on
Updated on

Godavari river pollution control project

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी १,४०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पीपीपी तत्त्वावर उभारणी करताना २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शहरात १,१४० कोटींच्या नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी शहरातील अस्तित्वातील २०५० किमी लांबीच्या मलवाहिकांचे सर्वेक्षण अलमण्डस या सल्लागार कंपनीमार्फत करण्यात येत असून, ग्रीनबॉण्ड, अमृत २ या योजनेच्या माध्यमातून मलवाहिकांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जात आहेत.

गोदावरी प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. विविध ठिकाणी मलवाहिकांद्वारे नदीपात्रात थेट सोडण्यात येणारे सांडपाणी या प्रदूषणामागील प्रमुख कारण आहे. या प्रदूषणाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेने नदीप्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Godavari river pollution control project
Uran taluka pulse farming : उरणमधील कडधान्याची लागवड लांबणीवर जाणार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी नदी स्वच्छ करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीपीपी तत्त्वावर १,४०० कोटींचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी मलवाहिकांचे नवीन जाळे तयार करण्याची योजनाही राबवण्यात येत आहे.

या माध्यमातून नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी मलनिःसारण केंद्रांकडे वळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरी वस्त्यांमधील सांडपाण्याच्या जुन्या मलवाहिका बदलून त्या ठिकाणी नवीन मलवाहिका टाकणे तसेच नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन मलवाहिकांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अलमण्डस या सल्लागार कंपनीने मनपाला १,१४० कोटींचा प्राथमिक आराखडा सादर केला आहे. या कंपनीमार्फत शहरातील मलवाहिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Godavari river pollution control project
Local body elections 2025 : महाडमध्ये काँग्रेसची भूमिका ठरणार महत्त्वाची?

नोव्हेंबरअखेर अहवाल होणार सादर

महापालिकेने १९९५ पासून ते २०२५ दरम्यान शहरात २०५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिकांचे जाळे निर्माण केले आहेत. आता यातील बहुतांश मलवाहिका या जुन्या, जीर्ण झाल्या आहेत. त्या ऐवजी अधिक क्षमतेच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी अलमण्डस या कंपनीमार्फत मलवाहिकांचे ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, नोव्हेंबर अखेर यासंदर्भातील अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

'अमृत २' योजनेची अंमलबजावणीही सुरू

दुसरीकडे नवीन मलवाहिका टाकण्याची योजनाही राबवली जात आहे. 'अमृत २' या योजनेंतर्गत २२७ कोटींची तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ग्रीन बॉण्डच्या एकीकडे मलवाहिकांचे सर्वेक्षण करतानाच माध्यमातून २२५ कोटींची मलवाहिका योजना राबवली जात आहे. उर्वरित ७०० कोटींच्या कामांसाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत.

अलमण्डस या सल्लागार कंपनीमार्फत शहरातील २०५० किमी लांबीच्या मलवाहिकांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात मलवाहिकांचे जाळे निर्मितीसाठी १,१४० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मलनिःसारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news